
७ फेब्रुवारी रोजी
आली जन्मास रमाई….
बाबांच्या अर्धांगिनींची,
किती वर्णावी पुण्याई….
लहानपणीच हरपले
रमाच्या आईवडिलांचे छत्र ….
भावंडासाठी रमाईने ,
नेसले ममतेचे वस्त्र….
लग्न झाले बाबांशी
झाली ज्ञानसुर्याची अर्धांगिनी…
गरिबीत केला संसार नेटाने,
नयनी कधी न आणले पाणी…
शिक्षणासाठी बाबा
असता दूरदेशी…
घराची सांभाळून धुरा,
शेण गोव-यां विकून लेकरांना पोषी…..
दिले वचन सास-याला
भिमाच्या शिक्षणांत पडू न देणार खंड….
राब ,राब, राबेन भिमासाठी,
पुकारेन गरिबीशी बंड….
सुखाचा संसार रमाच्या
कधी न आला वाट्याला….
त्याग मुर्ती,सोशिक,समंजस,
परि दुःखच टेकले पाठीला….
रात्रंदिवस करूनी काम
बाबांनी लिहिले संविधान…
पुण्याई तुझी माता रमाई,
दिनदलितांना मिळाले ज्ञान…
अशी रमाई होणे नाही
दिली बाबांना पदोपदी साथ….
दोघेही झटले समाजासाठी,
इथेच अमुचे जुळती हात….
कवयित्री – आशा फुल्लुके मेश्राम
बोरीवली मुंबई














