रमाई ची किती
गावी थोरवी
त्यागमुर्ती म्हणुनी
अभिमान वाटतो मनी
रमाईने केली उतराई
गरीबांची होऊनी आई
बनली रमाई आई
चंदना परी झिजूनी
सुगंधा परी माय ती
पती पत्नी एक होऊनी
दिले योगदान महत्त्वाचे
बाबासाहेबांना देऊनी साथ
घडविला इतिहास मोठा
स्वभिमानी रमाई
जगकल्याना साठी
खर्च केले जीवन सारे
शेण गवर्या विकुनी
दुःखात ही,सुख मनीले
दुःख जन्मभरी
भोगावी लागणार
माहित असूनी
साथ नाही सोडली
बाबासाहेबांची
दलितांच्या उद्धारासाठी
झटली रात्रन दिवस
अस्पृशयांना न्याय मिळवून देण्यासाठी
प्रयत्न केला अहोरात्र
खरी पतिव्रता नारी ती
बाबासाहेबांची अर्धांगिनी
दिव्यातील ज्योत बनून
प्रकाश चौफेर उजळत प्राणांची आहुती दिली
बाबासाहेबां सवे साऱ्यांना आपलस करुनी
बनली माय साऱ्या जगताची
रमाची झाली रमाई..
आम्ही पामार काय वर्णावी महती…
रमाई आंबेडकर यांना अभिवादन
कवयित्री – सौ. उमा परदेशी
नाशिक

