पूर्वी लव मॅरेज म्हटले की बहुतांश घरातून विरोध असायचाच. खूप समजावणे, रूसवे फुगवे झाले की थोडी फार परवानगी काही घरातून मिळत असे.आणि मग मोठ्या मुश्किलीने त्यांचे लग्न होत असे.
त्या उलट ठरवून केलेल्या लग्नात मुलगा मुलगी एकमेकांस पसंत करे. कोणाच्या ओळखीने स्थळ सुचवले जाई. मुलगा मुलीस बघावयास जाई. लगेच पसंती आणि मग पुढचे सगळे सोपस्कार होई. त्यामुळे वेळच्यावेळी लग्न मुला-मुलींची होत असे.
आता त्या उलट परिस्थिती झाली आहे. मुली खूप शिकतात, मग त्यांच्या पायावर उभ्या राहतात,शिकल्यानंतर त्यांच्या मुलांकडून अपेक्षाही वाढतात, मग त्या अपेक्षेप्रमाणे मुलं मिळत नाही, मग मुलींची वय वाढत जातात.
मुलांचे बाबतीतही असे होते की मुलींच्या खूप अपेक्षांमुळे त्यांना मुली मिळत नाही. हल्ली लग्नासाठी मुलींच्या अटी खूप आहेत. त्या एकत्र कुटुंबात मिळून जुळून घेण्यास तयार नसतात. त्यांना घरी काम करायचे नसते. आणि बरीच काही कारणे की ज्यामुळे लग्न जुळत नाही. दुसरे कारण असे की मुला मुलींच्या रेशीओ मध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे. या तफावतीमुळे मुलांना मुलगी मिळत नाही आणि मग दोघांचे वय वाढत जातात त्यामुळे भृणहत्या टाळली पाहिजे. मुलींचे गर्भ वाढवले पाहिजे.
हल्ली अरेंज मॅरेज जुळवणं हा आई-वडिलांसाठी एक मनस्ताप झाला आहे, आपली जबाबदारी म्हणून ते मुलासाठी मुलगी बघत असतात. पण मुलं त्या वधू ना या ना त्या कारणाने नापसंत करतात. मुला-मुलींची लग्न जमवणे हे खूप अवघड काम होऊन जाते.
त्यामुळे हल्लीच्या काळात मुलांनी लव मॅरेज केलेलेच खूप चांगले, त्यांच्यासाठीही आणि आई-वडिलांसाठी.
आता परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. आता परिस्थिती उलट झाली आहे.
काही ठिकाणी अपवादही असू शकतील. त्यामुळे हा वादाचा मुद्दा करू नये. हे माझे निरीक्षण आहे. पण असे नक्कीच म्हणावे लागेल की मुलगा मुलीला भेटेना आणि मुलीला मुलगी मिळेना…
लेखिका – रेखा डायस गोवा

