
राहीबाई सोमा पोपरे यांचा जन्म इ.स. १९६४ साली महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये कोंभाळणे या गावी शेतकरी कुटुंबामध्ये झाला .त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबामध्ये झाल्याकारणाने त्यांना देखील शेतीविषयक अनेक माहिती ही लहानपणापासूनच होती आणि त्यांना सध्या बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षक आणि संवर्धक म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांनी आपल्या देशी बियांच्या वाणाची जपणूक केल्यामुळे त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे.
त्यांनी २२ ते २३ वर्षापूर्वीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या बिया गोळा करण्यास सुरुवात केली होती आणि त्यांनी अनेक प्रकारच्या पीक बिया गोळा करून त्याची बीज बँक तयार केली आहे. यामध्ये काळावाल, तांबडावाल,१९ घेवळ्याचा जाती,१६ जातीचे भात व अनेक प्रकारच्या रानभाज्यांच्या देखील समावेश आहे.
राहीबाई कडे जे बियाणे आहेत ते शेकडो वर्षे आपल्या पूर्वज खात होते. ते मूळ स्वरूपातील आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी ३००० स्त्रिया व शेतकरी यांच्या बचत गट बनवला आहे त्यांच्यामार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपरिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळे नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.
शंभरहून अधिक देशी वाणांच्या संवर्धन करणाऱ्या राहीबाईंना *इ .स.२०२० साली मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले होते. पोपरे हसतमुखाने आणि नम्रतेने पुरस्कार स्वीकारुन ते आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोंभळणे या गावातील सर्व शेतकऱ्यांना समर्पित केले.
पद्मश्री सन्मान मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या मूळ मराठी ते गाव कनेक्शनमध्ये फोनवर संवाद साधला ” मी मी जरी हे पारितोषिक जिंकले असले तरी, मी नेहमीच लहान शेतकरी राहीन.”
प्रत्येक शेतकरी स्वयंरोजगार आहे भारताच्या बियाणे मातेच्या मते प्रत्येक जण न्यायाने आणि आदराने वागण्यास पात्र आहे .त्यांनी घोषित केले की, “हे बक्षीस माझे सर्व शेतकरी आणि माझी जमीन” आमच्या आईसारखी माती आहे..
सध्या त्यांना बीज माता म्हणून ओळखले जाते..
अशिक्षित राहीबाई यांचा ज्ञानाचा सन्मान कृषी वैज्ञानिक पण करतात..वेळोवेळी त्यांच्या कडून सल्ला घेत असतात..
राहीबाई यांचा बीज माता म्हणून प्रवास कसा सुरू झाला ते बघू या..
आपण जे खातोय ते हायब्रीड आहे आणि ते किती खाल्लं तरी ताकत वाढणार नाही.त्यामुळे आपली नातवंडं आजारी पडत आहेत.. गावरान वाण खाल्ले,तर नक्कीच आजार पडून जाईल..त्यांनी हायब्रीड ऐवजी गावरान वाणांची लागवड करायचं ठरवलं..
सुरुवातीला घरच्यांकडून खूप विरोध झाला.. मुलं म्हणाली ”
हायब्रीडने उत्पन्न वाढतं..पण राहीबाई
ठाम राहिल्या..गावातील लोकं , बचत गटातील बायका शेजारीबाजारी त्यांना वेड्यात काढायचे समाजात होणाऱ्या चेष्टेने त्या कधीच बेचैन झाल्या नाहीत .त्यात नगर जिल्हा म्हणजे पावसाचे प्रमाण कमी, कोरडवाहू जमीन, शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून मग असल्या भागात देशी वाणांची जपवणूक करायची कशी ? मोठं संकट त्यांचा समोर उभं होतं. त्यावरही त्यांनी मात केली कधी बैलगाडीने तर कधी डोक्यावरून पाणी आणून वान जागवली गावरान वाण शोधणे लागवड करणे त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे.
आपला स्वतः सेंद्रिय पद्धतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी सेंद्रिय पद्धतीची शेती करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर त्याने शेती सोबत वेगवेगळ्या प्रकारच्या बिया देखील संग्रहित सुरुवात केली आणि त्यांनी आजपर्यंत ११४ वाणांचे आणि ५२ बियांचे संरक्षण आणि संवर्धन केले आहे.त्यांच्या सीड बँक मध्ये २५० हून अधिक वाणांच्या बिया आहेत..
“सीड मदर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई सोमा पोपरे यांचा 100 Women बीबीसीच्या प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादी समावेश करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात काम करून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या जगातल्या शंभर महिलांची यादी ही म्हणजे बीबीसी 100 Women.
राहीबाई यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्याने रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता विषमुक्त शेती करावी. देशी वाणाचे जतन करावे कारण जुनं ते सोनं अन् खणखणतं नाणंआहे..जश्या प्रत्येक गावात पैशाच्या बँक आहेत तसेच बियांचे पण बँक हवे ..
लेखिका-माला मेश्राम
नवी मुंबई














