prabodhini news logo
Home यवतमाळ लेख -“लग्न एक विचार”

लेख -“लग्न एक विचार”

0
260

आज मुलांचे लग्नाचे वय जरी 18/21असले तरी लग्न हे वयाच्या 30/35 वर्षात होत आहेत. कित्येकाचे तर होत ही नाहीत तो भाग वेगळा…कारण प्रत्येकाला लग्नाअगोदर स्वतःची एक ओळख. एक अस्तित्व बनवायचं असतं. आणि बनवल ही पाहिजे पण यामध्ये मुलगा असो किं मुलगी त्यांना स्वतःच जीवन स्वतःच्या नियमावर जगायची सवय होऊन जाते आणि यामध्ये आजची तरुण पीढी तडजोड करायला पहात नाही. म्हणून लग्न हा एक आज समाजापुढे खूप मोठा गहन प्रश्न आहे
लग्न म्हटलं किं प्रथम मुलगा बघा /मुलगी बघा हा प्रश्न सर्वासमोर उभाच असतो मुलं वयात आली किं घरातील वडिलधाऱ्यांची ड्युटी सुरु होते. प्रथम जवळच्या नातेवाईकांमध्ये बघूया. नंतर जरा दूरच्या नातेवाईका कडे चौकशी करूया असा
एकंदरीत तपास सुरु असतो पण त्यां एका गोष्टी मागे हजारो प्रश्न, हजारो अडचणी डोकं वर काडत असतात
जर मुलाकडचा विचार केला अन मुलगा नोकरी करत असेल तर त्याच्या
वं घरच्या लोकांच्या पण भरपूर अपेक्षा असतात, मागण्या असतात जस किं लग्न दणक्यात करून पाहिजे, मुलीला स्वयंपाक आला पाहिजे, गिफ्ट्स मध्ये काय हवं नको ते, स्वागत शाही पाहिजे अश्या बऱ्याच वेगवेगळ्या मागण्या असतात
त्याविरुद्ध मुलीच्या मागण्या ऐकल्या तर मुलगा विचार करतो लग्न करावं किं नको बाबा..
प्रथम तर तो किती कमवतो, तो काय करतो, व्यसन आहे का, मित्र मंडळ कसं आहे, त्याला शेती आहे का, असेल तरी मुलगी शेतात जाणार नाही
घरातली सर्व काम मुलगी करणार नाही मुलीला तीच वयक्तिक स्वतंत्र्य हवंय, ती कोणाच्याही बंधनात रहाणार नाही. तीच राहणीमान बदलणार नाही, तिचे मित्र/मैत्रिणी यांना ती भेटणार त्यांना वेळ देणार
अश्या एक ना अनेक अटी मुलींच्याकडूनही असतात.
आज मुलं कितीही शिकली तरी नोकऱ्या प्रत्येकाला मिळण शक्य नाही आणि व्यवसायासाठी खूपदा
पुरेसं ज्ञान नसतं किंवा आर्थिक बाजू कमकुवत असते म्हणून तिथेही मुलं अपयशी ठरतात आणि शेतकरी तर कुठल्याच मुलीला नको असतो तरीही या सर्वांमध्ये मध्यस्थी साधून लग्न जुळवण्याचा प्रयत्न होत असतो तो सफलही होतो पण लग्न जुळण्यापेक्षा लग्न टिकन हा खूप मोठा प्रश्न आहे आज दहा मधून 2लग्न टिकत आहेत ही खूप गंभीर गोष्ट आहे समाजातली पण सत्य परिस्थिती आहे, आज आपली तरुण पीढी ज्यां प्रवाहात वाहत आहे त्याचा शेवट काय हे कोणालाच माहिती नाही त्यात सर्वात मोठा पाया म्हणजे प्रेमाविवाह यामध्ये दोघेही स्वतःच वयक्तिक स्वतंत्र्य जगता जगता दोघांचे पटत नाही अगदी किरकोळ भांडण ही घटस्फोट च कारण बनत आहे आणि हे दाम्पत्य जीवनाचं समीकरणचं होऊन बसलंय
त्यातच एकमेकांबद्दल गैरसमज, व्यसन, मोबाईलच्या अतिवापरामुळे कमी झालेला संवाद न यातून वाढणारे वाद, कोणी कोणाचं ऐकावं, तो बदलेल, ती, बदलेल,मी नाही बदलणार हा न्यूनगंड आज संसारात विष परत आहे.
शेवटी काय तर मुलगा असो किं मुलगी प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आपल्याकडे काय आहे आपल्या अपेक्षा काय आहेत याचा विचार करायला पाहिजे शेवटी लग्न म्हणजे जीवनाचा प्रश्न असतो प्रसंगी काही तडजोडी कराव्या लागतात, काही प्रसंगात मनाच्याविरुद्ध का होईना पण एकमेकांना आधार द्यावा लागतो आहे त्यात समाधानी जगता यावं हे बीज नवीन पीडित जर रुजल तर मुलगा किंवा मुलगी मिळत नाही हा प्रश्न संपुष्ठात येईल आणि मुलाला मुलगी, मुलीला मुलगा नक्कीच मिळेल.

लेखिका
सौ.सीमा शैलेश गाडेकर
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here