prabodhini news logo
Home नागपूर लेख – माझ्या स्वप्नातला देश कसा असावा….????

लेख – माझ्या स्वप्नातला देश कसा असावा….????

0
196

माझ्या स्वप्नातला भारत देश विविधतेने,नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असावा.सारे भारतीय गुण्या गोविंदाने एकत्र नांदावे.कोणी उच्च,नीच, श्रीमंत – गरीब जाती पाती भेदभाव त्यात नसावा. त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार असावा.एकमेकाच्या कुरघोड्या करता एकत्र गुण्या गोविंदाने नांदावा. आपला देश कृषिप्रधान देश आहे.
सुजलाम्, सुफलाम् धरणी असावी.सारे भारतीय सुशिक्षित असावे,देशात अंधश्रद्धेला थारा नसावा.विज्ञान अग्रेसर स्थानावर असावे. वैज्ञानिक दृष्टिकोन असावा.व्यक्ती स्वातंत्र्य असावे. देशातील न्याय व्यवस्थेवर राज्यकर्त्याचा दबाव नसावा. गुन्हेगारास सजा अवश्य मिळावी. संविधानानुसार देश चालवावा.
राजकारणातील नेते लोकांनी परदेशात आपल्या देशाचे खराब होईल अशी नीती चालवू नये.सरकारने नेहमीच जनहिताचे निर्णय घ्यावेत.
आपल्या भारतात लोकशाहीनुसार राज्य चालते. संविधानाचा आदर व्हावा. कायद्याच्या चौकटीत राहून जन हित साधेल अशा योजना राबवून तळागाळातील गरिब जनतेपर्यंत त्या पोहोचवून त्यांना लाभ मिळेल असे उपक्रम राबवावे. लोकशाहीत
व्यक्तीपूजा टाळावी.आमदार, खासदार हे जनतेचे जनसेवक म्हणून काम करावे.
राजकर्त्यांनी मनमानी कारभार करू नये.देशातील शेतकरी आत्महत्तेपर्यंत पोहोचणार नाही. याची काळजी घेतली जावी .जाती धर्मातून मुक्त असावा. माझा देश प्रत्येक नागरिकांच्या हिताचे निर्णय घ्यावे. एकमेकाचे पाय ओढण्याचे काम करू नये.आपल्या देशाची नाचक्की होईल असे वर्तन करू नये. प्रत्येकानी आपली मर्यादा सांभाळून कर्तव्यनिष्ठतेने देशाचे कार्य करावे. आपल्या देशात शांतता नांदेल अशी व्यवस्था असावी. तरी नेते मंडळीनी आपल्या बदनामी होईल असे वत्कव्य करू नये.आपले भाषणात सभ्य भाषेचा प्रयोग करून सन्मानपूर्वक बोलावे.एकमेकांचा आदर राखावा. असे नाटकीय भाषेत साध्या भोळ्या जनतेला जातीपाती अन् धर्माच्या नावावर भटकवू नये.कारण आता जनता शिक्षणामुळे सरकारला प्रश्न विचारू लागली. आता जनता अडाणी राहिली नाही. जनता हुशार आहे. आज जनता समजदार झाली आहे… भ्रष्टाचाराला आळा घालावा.या देशात उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या. विदेशातील विद्यार्थी या देशातील शिक्षण घेण्यासाठी रांगाच्या रांगा लागाव्या. जसे पुर्वी नालंदा तक्षशिला विद्यापीठ होते तेव्हा विदेशातील विद्यार्थी भारतात शिकायला येत होती. त्यावेळेपासून भारत हा बुद्धाचा देश होता आणि आज ही विदेशात तीच ओळख आहे. भारताला हिंदू राष्ट्र म्हणून ओळखत नाही. ही गोष्ट आजही राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावी रोजगार एवढे उपलब्ध व्हावे.की,कोणतीही वस्तू ती इलेक्ट्रॉनिक असो टेक्निकल असो ती इथेच उपलब्ध करून भारतातून विदेशात निर्यात झाली पाहिजे . भारतीय विद्यार्थ्यांला संशोधनासाठी संसाधन उपलब्ध करून द्यावे. भारतीय तरूणाला विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची व तिथे नोकरी करण्याची गरज भासू नये.जर हे सगळं आपल्याच देशात मिळाले तर इथले तरूण नोकरीसाठी विदेशात जाणार नाहीत.आणि त्याचा फायदा देशाला होऊन त्यातून विकास कामे साधली जावी . भारतीय सीमेवर जे सैनिक आहेत ते रात्रंदिवस सीमेवर आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करतात त्यांच्या गरजा पुर्ण कराव्या. त्यामुळेच आपण सर्व भारतीय शांततेने झोप घेऊ शकतो. त्याला आधुनिक तंत्रज्ञानानातील शिक्षण उपलब्ध करून द्यावे.त्यांना योग्य यंत्र सामुग्री उपलब्ध करून द्याव्यात.बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. नोकरभरती न थांबवता सुशिक्षित तरूणाला नोकरीच्या संधी उपलब्ध कराव्या. प्रत्येक तरूणाच्या हाताला लहान मोठे काम मिळेल अशा सरकारी योजना राबवाव्यात.कोणताही कामगार उपाशी राहणार नाही. त्याच्या हाताला काम मिळेल असे रोजगार उपलब्ध करावे. शेतक-यांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून. त्यांना आपत्कालीन स्थितीत कर्जमाफी द्यावी. शेतक-यांसाठी अनेक योजना राबवून शेतक-यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देणे, उच्च दर्जाचे औजार ,रासायनिक खते किटक नाशके कृषी विकास करणे. आधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध करावे.जेणे करून कोणताही शेतकरी आत्महत्येचा विचार करू शकणार नाही. बेकारी वाढल्यामुळे बेकार तरूण तरुणावर चोरी ,लुटमार करण्याची वेळ येणार नाही.अशी योजना जाहीर करावी.बेरोजगारांचे प्रश्न सोडवावे. स्त्रीयांचा सन्मान करावा. स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी. स्त्रीयांवर कोणत्याही प्रकारची शक्ती आणि बंदी नसावी. त्यांचे शोषण होणार नाही याकडे लक्ष द्यावे. त्या जरी विवाहित असोत की नसोत त्यांच्या भावनांचा विचार करून आदर करावा. कोणत्याही स्त्रीवर बलात्कार किंवा तिचा शारीरिक व मानसिक छळ होणार नाही याचा विचार शासनात योग्य उच्च शिक्षित लोकांनाच निवडून देवून प्रामाणिक पणे शासन चालवावे. देशहिताचे निर्णय घेतले जावेत. आजकाल निसर्गातील बदल पाहात आहोत कुठे अतिवृष्टी दुष्काळ असतो म्हणून प्रत्येक नागरिकांनी एकेक झाड लावून जंगलाची निर्मिती करावी. आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करावे.आणि पर्यावरणाला जपावे.
या देशात सर्व नागरिक शांततेत आणि एकत्र समता, बंधुता, एकतेने नांदावे.
आणि भारताचे नाव जगप्रसिद्ध व्हावे. आपल्या भारताचे नांव विकसित देशात गणल्या जावे. शहर असो की, गाव असो प्रत्येक गावात सर्व सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सारे भारतीय बांधव गुण्या गोविंदाने एकत्र सुखा समाधानात नांदतील. असा माझ्या स्वप्नातील भारत असावा.

लेखिका
सौ. कल्पना अशोक टेंभूर्णीकर
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here