आई मी तुझ्या कवेतील पिल्लु
तुचं सावरणारी आणि तुचं अश्रूं पुसणारी
आई तुझी माया आभाळागद
तुझ्या मायाची तुलनाच नाही
आई मी तुझ्या कवेतील पिल्लु …
तुझे स्मरण होता..
प्रत्येक क्षण जिवंत होई…
आणि क्षणात जगून जाई..
तुझ्या मायेच्या प्रेमाच्या पाळण्यात.
आई मी तुझ्या कवेतील पिल्लु…
आई तुझीचं गं मी सावली
तुझ्याच गं संस्काराचा पुतळा
तु तसी.. मी तसीच सारली
आणि! तुझ्या गुणाची गाठोडी मी झाली
आई मी तुझ्या कवेतील पिल्लु….
काय तुझे आदर्श …
सा-या जगाला लाजवी…
आणि! तुझ्या पुण्याचा पुतळा…
माझ्या कपाळी लागे…
आई मी तुझ्या कवेतील पिल्लु….
मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी
असेच जग बनून गेले माझे…
आणि! सारे विश्व माझे …
तुझ्या भोवती संस्काराने फिरू लागले
आई मी तुझ्या कवेतील पिल्लु …
आई मी तुझ्या कवेतील पिल्लु …!
कवियत्री प्रा.शितल कंबाननी
नागपूर

