रेणू पोवार
महिला जिल्हा प्रतिनिधी,
कोल्हापूर
छत्रपती श्री. शाहु महाराज जयंती निमित्ताचे औचित साधुन भाट समाज बहुउद्देशिय सेवा संस्था संघटनेचा दुसरा मेळावा 2/7/2024 अशोक शिंदे सांस्कृतिक हाॅल कळंबा, कोल्हापूर येथे संपन्न झाला तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच सदस्य मधुकर पुजारी यांनी उत्कृष्ट प्रकारे सुत्रसंचालन केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष भाट समाज वेल्फेअर चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय कार्यकारणी सचिव दिपक साळवी उपस्थित होते तसेच अभिजीत भाट व दिपक साळवी यांनी समाजातील युवा युवतींनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्याची गरज भाट समाज आर्दश समाज म्हणून नावारूपाला यावा या संदर्भात मनोगत व्यक्त केले, भाट समाजातील उच्च शिक्षित महिला प्रा. डॉ. वैशाली गुंजेकर यांनी भाट समाज बधु भगिनींचा भुमिका आणि संघटना वाढिसाठि अपेक्षा या बाबत मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे घ्या हस्ते गुणवत्ता विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करुन शुभेच्छा दिल्या तसेच कोल्हापूर जिल्हातील महिला भगिनीसाठी हळदिकुंकू सभारंभ आयोजित करण्यात आला तसेच भाट समाजबांधवांच्या जिव्हाळ्याचा व आग्रहाचा विषय असेलेला वधूवर परिचय हा कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी 40 वधु वरानी सहभाग घेतला यावेळी संस्थेचे अध्यक्ष विवेक वाडेकर, कार्याध्यक्ष संजय भाट, महिला विभाग अध्यक्षा मनिषा मोरे, खजिनदार सुधाकर पुजारी, उपाध्यक्ष अशोक भाट, सहसचिव प्रमोद मोरे, सुर्यकांत मोरे, उमेश मोरे,रविंद्र भाट,दिपक भाट, पृथ्वीराज भाट, अमित चव्हाण, मंगल भाट, अमोल भाट , कार्यकारणी सदस्य उपस्थित होते खजिनदार सुधाकर पुजारी यांनी सर्वांचे आभार मानुन पुढच्या भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक अभिनंदन केले सदर मेळाव्यात कोल्हापूर जिल्ह्यातून 350 हून अधिक समाज बांधव भगिनींनी उत्साहिने सहभाग घेतला उत्कृष्ट प्रकारे हा मेळावा राबविण्यात आला.

