कविता – माय…

0
47

आयुष्याच्या ममतेचं वात्सल्य असते ती
नशीब घडवणारी माऊली असते ती
पोटच्या लेकरासाठी पिळ देत असते ती
उन्हातान्हात राबणारी माय असते ती

बापाच्या कष्टाला आधार असते ती
रानातल्या घामाची सोबत असते ती
संसाराचा गाडा हाकतांना सारथी असते ती
असलं नसलं तरी संसार चालवत असते ती

दुःखलं खुपलं साऱ्यांच बघत असते ती
स्वतःचं दुःख मनात लपवत असते ती
नात्यांचा धागा नेहमी फुलत ठेवते ती
नाती जपताना वाती सारखं जळत असते ती

घराला घरपण देणारी गृहिणी असते ती
स्वयंपाक घराच्या विश्वात रमत असते ती
मुलांच्या डब्यातला स्वाद असते ती
रात्र दिवस घरासाठी राबत असते ती

पंख फुटलेल्या मुलांसाठी झुरत असते ती
एका भेटीसाठी नेहमीच आतूर असते ती
वाट पाहता पाहता जग सोडून जाते ती
जिवनाचं सर्वस्व फक्त माय असते ती
जिवनाचं सर्वस्व फक्त माय असते ती

कवी – श्री. दिपक पांढरे
माजलगाव जिल्हा बीड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here