सेतु चालकांनी दिला तहसीलदार यांना निवेदन
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजने अंतर्गत महिलांना मासिक १५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजने अंतर्गत मोबाईल अॅपव्दारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना लाभाथ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी ५०रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आणि सदर शासन निर्णय २ जुलै २०२४ रोजीच्या मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला। तसा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला, मात्र सेतु केंद्र चालकांना
या कामाचे किती मानधन मिळणार याबाबत आपल्या स्तरावरुन कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय काढण्यात आला नाही. उलट जर सेतु चालकांनी पैसे घेतले तर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. आम्हाला पोटपाणी आहे, आम्हच्याकडे जे मुले काम करतात त्यांना पगार द्यावा लावतो,
विज बिल व इतर खर्च ही येतो त्यामुळे मोफत काम कसे करणार? आम्हाला योग्य तो मोबदला मिळाला पाहीजे अशी त्यांची मागणी आहे.
शासन प्रत्येक योजनेचे अर्ज भरतांना त्याचे दर जाहीर करते. त्याचप्रमाणे या योजनेचा सुध्दा कामाचा मोबदला जाहीर करावा व तसा शासन निर्णय काढण्यात यावा. अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील सर्व सेतु केंद्र चालकांनी तहसीलदार संदीप पानमंद यांना निवेदना मार्फत केली.

