सुविद्या बांबोडे
जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज चंद्रपूर
श्री. स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक योगा क्लास, निर्माण नगर तुकूम चंद्रपूर चा जुलै महिन्याचा योगा क्लास आज मंगळवार दिनांक 09/7/2024.सकाळी 06.30 ते 08.30 पर्यंत सर्व प्राणायाम, आसने, सूर्य नमस्कार, योगिग जॉगिंग. व्याघ्र प्राणायाम, हास्य प्राणायाम, गोमूख आसन. एकनाथ महाराज लोटांगण सुद्धा घेतल्या जातात. रगडून रगडून आसन प्राणायाम घेतल्या जातात. सर्वाना पश्चिना सोडल्या जातो.सगळे साधक साधिका खुप खूष राहतात. येथील योगा क्लास मद्ये सर्व 60 वर्षा वरील साधक साधिका आहेत. आजचा योगा क्लास जेष्ठ योग शिक्षक तथा जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेशजी ददगाल सर पतंजली योग समिती चंद्रपूर.जेष्ठ योग शिक्षक श्री भोलाराम सोनुले, सहयोग शिक्षक पांडुरंग पंढरे, सहयोग शिक्षक श्री लक्ष्मणजी सोनुले यांनी घेतला. येथील योगा क्लास मद्ये बरेच सहयोग शिक्षक आहेत. ते सुद्धा योगाचे क्लास घेतात.सहयोग शिक्षक श्रीकृष्ण जांभुळकर, सहयोग शिक्षक हेमराज नंदेश्वर, सहयोग शिक्षिका शालिनीताई कोहळे, सहयोग शिक्षिका पुष्पान्जली सोनुले, सहयोग शिक्षिका मीनाक्षी जगम, सहयोग शिक्षिका सुरेखा कुळमेथे, सहयोग शिक्षिका सुरेखा निमसटकर हे सर्व प्रत्येकाच्या गैरहजरी मद्ये योगा क्लास घेतात.एकंदरीत येथील वातावरण खुप छान आहे. सर्व खुश आहेत.
आजचा क्लास शांतिपाठ घेऊन समाप्त करण्यात आला.

