प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – केंद्र सरकार ने या पुढे 25 जुन हा संविधान हत्या दिवस जाहिर करण्याचे ठरविले आहे. हा निर्णय देशातील कोणत्याही नागरीकांना न पटणारा असून हा जाणीवपुर्वक काँग्रेस चे खच्चीकरण करण्यासाठी केंद्र सरकार ने घाट रचल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे.
केंद्र शासनातील एनडीए सरकार हे स्वतः संविधान विरोधी असून यांच्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी स्वतः संविधान बदलाची भाषा करुन संविधानाचा अपमान केला आहे. अनेक संविधान विरोधी कृती करणाऱ्या केंद्र सरकार ने संविधानाची हत्या दिवस साजरा करणे हे हास्यास्पद असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणूकीत 272 जागा बहूमताला पाहिजे असतांना 400 चा नारा देऊन संविधान बदलाची भाषा भारतीय जनता पार्टी च्या खासदारांनी केली होती. आणीबाणी च्या काळातील अनेक बाबी चुकीच्या पध्दीतीने भारतीय जनता पार्टी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हा प्रयत्न कदापीही यशस्वी होणार नाही. काँग्रेस पक्ष हा लोकशाही टिकविण्यासाठी संविधानाचा सन्मान करणार पक्ष असून याच मुद्दयावर काँग्रेस पक्ष निवडणूकांना समोर जावून यश प्राप्त करीत आहे. संविधानाची हत्या करणारे खरे गुन्हेगार हे भारतीय जनता पार्टी च असून केंद्र सरकार च्या भाषेत संविधान हत्या दिन एक दिवस नाही तर संविधान हत्या दशक साजरे करावे, असा टोला खासदार धानोरकर यांनी संविधान हत्या दिन साजरा करण्यासाठी काढलेल्या केंद्र सरकारच्या निर्णयावर केला. आणीबाणी च्या काळात देखील काँग्रेस पक्ष हा जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे अवघ्या देशवासीयांनी बघितले होते. या निर्णयाविरोधात येणाऱ्या अधिवेशनात निषेध देखील व्यक्त करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले.

