
शालेय मंत्रिमंडळ निवडणूक
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर- शनिवारची शाळा विना दप्तर ची शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव यावा यासाठी विद्या प्रसारक संस्था द्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे प्रत्यक्ष निवडणुकीचे आयोजन करून शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली.
एका वर्गामध्ये प्रत्यक्ष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. केंद्राध्यक्ष व निवडणूक अधिकारी यांचे आसन निर्माण करण्यात आले. मग टाकण्यासाठी सुशोभित मतपेटी तयार करण्यात आली. वर्गातून निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींना बॅलेट पेपर देण्यात आला.
अनुक्रमांकनुसार मतदार यादी प्रमाणे सर्व मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत शालेय मुख्यमंत्री कुमारी अर्पिता रामटेके, उपमुख्यमंत्री कुमारी दर्शनी झाडे, सहल मंत्री कुमारी राधा सगळाम, आरोग्य व स्वच्छता मंत्री कुमारी शाल्मली लोखंडे, सांस्कृतिक मंत्री कुमारी अवनी जनबंधू, शिक्षण मंत्री पारुल नागदेवते, क्रीडामंत्री पूर्वा लोखंडे यांनी विजय मिळवला. निवडणूक घोषित झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी बँड च्या तालावर गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी उमेदवारांना रीतसर प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मत टाकण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून कुमारी गायत्री बगडे तर निवडणूक अधिकारी म्हणून गायत्री कोलप्यकवार, साधना ठाकरे, प्रबोधिनी गेडाम तर मतमोजणी अधिकारी म्हणून विशाखा वनस्कर यांनी कर्तव्य बजावले. निवडणुकीचा आनंद सर्व विद्यार्थिनींनी मनापासून घेतला. सर्वोदय कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य कु. संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक विलास धुळेवार, संदीप भरडकर, संजय जोनमवार, मनोहर आत्राम, किशोर कावळे, स्वप्निल उके, विनय खोब्रागडे, सुरेश दोडेवार, कृष्णा ठीकरे, मनोज पाकमोडे, जयश्री यादव, मंजुषा कुर्रेवार, भारती जयस्वाल यांनी निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.














