prabodhini news logo
Home नागपूर लेख – माझे गुरू

लेख – माझे गुरू

0
139

आज दि. 14/7/24 लेख – माझे गुरू

अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि आम्हाला मानवतेचे दर्शन घडविणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे महान गुरू जगात कोणीही नाही.शोधुन बघा.त्यांची शिकवण अजुनही जगाला शांतीचा संदेश देते.जगात शांती असेल तर युद्धाची गरज भासणार नाही.समानता असेल चोहीकडे तर दहशत निर्माण होणार नाही.समाजात विषमता असल्यामुळे चोहीकडे अराजकता निर्माण होते.
बालकांचे आई, वडील प्रथम गुरु असतात.नातेवाईक, शेजारी,आपले सवंगडी यांच्या समवेत आपण बरेच काही शिकत असतो.शाळेत आपल्याला प्रमाणपत्र मिळते.पदव्यांचे.
व्यावहारिक शिक्षण तर आपल्याला अनुभवातून मीळत असते.निसर्गाकडुन आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे.
अन्न,धान्य, जगण्यासाठी प्राणवायू निसर्ग आपल्याला अगदी मोफत देतो.सुर्य आपल्याला प्रकाश देतो.मागतो का तो बील.नद्या भरपूर पाणी देतात.पावसाचे पाणी धरतीला सुजलाम, सुफलाम बनविते.धरती मुक्त हस्ताने धनधान्यांनी आपली झोळी भरुन टाकते.
पण मानव स्वार्थासाठी प्रदुषण निर्माण करतो.एवढा सुंदर कोकिळेच्या आवाज असताना डिझेच्या आवाजाने बेधुंद होतो.
नदी झरे कसे शांत वाहतात.ते संगीत कानाला मधुर वाटते.ते नैसर्गिक सुर मनात साठवाना, निसर्ग एक महान गुरू आहे तो फक्त देत असतो.मागत काही नाही.
शिकवणी घेऊन पैसा कमावणारे गुरू गल्लोगल्ली दिसतात.
गुरू विषयी आपल्याला आदर वाटायला हवा.त्यांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी आदर्श असावे.
गुरूचा असावा तर्कशुद्ध वैज्ञानिक जगण्याचा दृष्टिकोन मग घडेल प्रत्येक विद्यार्थी वैज्ञानिक एडिसन.
आपण जगत असताना अनेक गुरु आपल्याला भेटतात.आपण त्यांच्या कडुन नकळत बरंच काही शिकत असतो.साहित्यक्षेत्र, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, अनेक नामवंत लेखक,कवी, साहित्यिक आपले गुरू असतात.प्रत्येक गुरूकडून आपण काही तरी शिकत असतोच.
नैसर्गिक साधनसंपत्ती रक्षण करूया.निसर्गाने खुप सारे दिले आहे न मागता, फक्त त्याला जतन करायचे आहे.

लेखिका – शोभा वेले
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here