आज दि. १४/७/२०२४ लेख – माझे गुरु माझे वडील
माझे पहले गुरु माझे वडील आहे, त्यांच्याचं सानिध्यात माझे बालपण गेले.माझी दिवसाची सुरुवात माझ्या वडील संग व्हायची.माझ्या शाळेची घाई आणि माझ्या वडीलांचे मला अंघोळ घालुन शाळेला तयार करणे.डबा बांधने ,माझे केस करुन वेणी गुंफुन देणे.शाळेचा ट्रेस घालुन देणे व मग शाळेत गाडीने पोहचवून देणे नंतर शाळेतुन आणायला येणे.बाबाच्यां गाडीने रमतगमत गाडीने नानाजीच्यां घरी जाने तिथे थोड़ा वेळ थांबणे व मग घरी निघणे वडीलासोबत गाडीने रमतगमत घरी यायचे.असा सहवास माझा वडील सोबत रोजचा राहचा असे माझे बालपण माझ्या वडीला सोबत गेले.असे माझे पहले गुरु माझे वडील आहे.
माझे गुरु माझे पिता
गुरुच्यां चरणी माझे माथे…
देवतुल्य माझे गुरु माझे पिता
सदैव जीव लावला आपल्या जीवा पेक्षा
असे माझे गुरु माझे पिता…
प्रेममायाने पांघरुण घालणारे
माझे पिता माझे गुरु…
आयुष्यांची सावली करुन गेले
माझे गुरु माझे पिता…
जीवनांचे सारे सार सांगुण गेले
माझे गुरु माझे पिता…
लेखिका – प्रा.शितल कंबानी
नागपूर

