कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ९६ वा स्थापना दिवस समारोह संपन्न.

0
42

कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून साजरा केला स्थापना दिवस

उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादीका, अमरावती 9921400542- आज दिनाक 18/7 अमरावती भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली चा आज ९६ वा स्थापना दिवस समारोह दिल्ली येथे आयोजित करण्यात होता. देशातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अंतर्गत देशातील सर्व १११ कृषी संस्थान, ७३ कृषी विद्यापीठ, ७३१ कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमांमध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे उद्घाट्न देशाचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महानिदेशक डॉ. हिमांशू पाठक यांनी केले.
भारतातील कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी यांनी नुकतीच स्थापन केलेल्या अखिल भारतीय स्तरावरील ” फोरम ऑफ केवीके अँड ए. आय. सी. आर. पी.” संघटनेच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण देशातील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांनी आजचा दिवस काळी फीत लावून दिवसभर कामकाज केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत येणारे कृषी संस्थान, विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनामध्ये, सेवा नियमांमध्ये मोठी तफावत असून ही तफावत ताबडतोब दूर करावी व कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर करावा, ही प्रमुख मागणी केन्द्र शासनाकडे केली आहे..
या आंदोलनामध्ये कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापुरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख प्रभारी डॉ. के. पी. सिंग, विषय विशेषज्ञ कृषि विस्तार प्रतापराव जायले, विषय विशेषज्ञ गृह विज्ञान डॉ. अर्चना काकडे, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या प्रफुल्ल महल्ले, विषय विशेषज्ञ पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय महेश आखूड, कार्यालय अधीक्षक संतोष देशमुख, आरती वर्मा, राहूल घोगरे, आकाश धरमकर, सुरेश वैद्य, ज्ञानेश्वर जीराफे यांचेसह अश्विनी रंगे, प्रणाली देशमुख, सचिन पिंजरकर, अक्षय गणेशपुरे, ऋषिकेश शिंदे, महेंद्रसिंह सेंगर, सुनिल तिडके, शाम भुरके, स्नेहा सवाई, शुभम रेवस्कर, सिद्धार्थ गडलिंग यांचे सह मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here