prabodhini news logo
Home कविता कविता – श्रावण

कविता – श्रावण

0
193

आला सजून श्रावण
धरा नटून बसली
फुलं माळून वेणीत
गाली हळूच लाजली।।१।।

आला सजून श्रावण
ऊन सोनेरी जहाले
खेळ खेळत सावली
हसू गालावर आले।।२।।

आला सजून श्रावण
आता मोकळ्या रानांत
हित गुज सांगे पक्षी
एकमेकांच्या कानात।।३।।

आला सजून श्रावण
सुख आले धरतीला
नवी नटली नवरी
शालू हिरवा नेसला।।४।।

आला सजून श्रावण
खेळ खेळतो पानात
ऊन सावलीचा खेळ
पक्षी खेळती रानात।।५।।

आला सजून श्रावण
ऊन पाऊस खेळतो
एक चिमुकला दीप
लक्ष अंधार जाळतो ।।६।।

कवियत्री -प्रा. कु.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here