रिमझिम आनंदाचे
गात गोड गोड गाणी
श्रावणाच्या सरी बघा
चोहीकडे झाले पाणी
घरट्यात लपलेले
पशु, पक्षिगण सारे
सुटलेय आहे इथे
कसे गार गार वारे
आनंदाने प्रमोदीत
अवनी ही सजलेली
चोहीकडे दिसतेय
हिरवाई नेसलेली
वृक्षवल्ली बहरली
नद्या नाले भरलेली
बळीराजा आनंदीत
शेत पिके पेरलेली
पावसाने आसमंत
शांत शांत वाटतोय
सजिव सृष्टी साठी
मेघ हा बरसतोय
श्रावणात क्षणातच
उन पडतेय थोडे
सरसर पावसाचे
रिमझिम थेंब पडे.
कवियत्री – शोभा वेले
नागपूर

