कविता – श्रावनाच्या सरी

0
78

आल्या श्रावनाच्या सरी
भिजला आसमंत सारा
तहानलेल्या धरतीने
केला हिरवा शृंगार न्यारा

सरी मागून सर येता
वृक्ष, वेली, झाली शांत
डोंगर माथ्यावर टाकून मान
स्वप्नात निजली निवांत

येता श्रावण सरी
पक्षी गाई गीत गोड
न बागडता सैरावैरा
त्याला घरट्याची ओढ

सर श्रावणाची आली
धरती आनंदली
बरसता सर ती
मातीला बिलगली

डोंगरमाथ्यावर बरसता
श्रावनातल्या सरी
बेभान पावसात त्या
दाटतात आठवणी उरी

कवियत्री – सीमा गाडेकर
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here