मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना- अरविंद राऊत यांची सदस्यपदी निवड

0
142

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सनियत्रण व आढावा समिती मध्ये विधानसभा क्षेत्र सदस्य म्हणुन अरविंद राऊत यांची निवड करण्यात आली. सदर निवड मान. सुधीर भाऊ मुनगंटीवार, वने व सांस्कृतिक, मत्सव्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या शिफारशीनुसार कऱण्यात आली. समितीच्या सदस्य पदावरून महिलांच्या हितासाठी सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होणार तसेच विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांना या योजनांचा लाभ मिळवून देऊन महिलांना सक्षम करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. सदर निवडीबद्दल ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्यात.
यावेळी राजू पाटील बोरकर सिंदेवाही भाजपा तालुका अध्यक्ष,नागराज गेडाम तालुका सरचिटणीस तथा जी. प. समाजकल्याण माजी सभापती , प्रा. गोपीचंद गणवीर। भाजपा ज्येष्ठ नेते, युवा नेते रितेश अलमस्त, भाजपा कार्यकर्ते कमलाकर सिधमशेट्टीवर, देवराव कोठेवार, माजी उपसभापती श्रीराम डोंगरवार, अशोक गभणे उपसरपंच रत्नापुर, तारा राऊत सरपंच पेंढरी, संदीप डोंगरवार, राजू बनसोड सरपंच, भक्तदास चौधरी, सचिन कराडे, घनशाम चौखे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here