prabodhini news logo
Home गडचिरोली गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील इंटरनेट मुळे उद्भवनाऱ्या समस्याबाबत खासदार डॉ. किरसान यांनी उपस्थित...

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील इंटरनेट मुळे उद्भवनाऱ्या समस्याबाबत खासदार डॉ. किरसान यांनी उपस्थित केला संसदेत प्रश्न

0
152

समस्यांचे निराकरण करण्याची केली मागणी

ऑफलाईन पद्धतीने राशन वितरण करण्याचीही केली मागणी

राहुल वासनिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली,- गडचिरोली – मोदी सरकार डिजिटल इंडिया चा नारा देत, प्रत्येक योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अद्यापही नेटवर्क चे जाळे पोहचू शकले नाही. इंटरनेट च्या शोधात  नागरिकांना कोसो दूर जावा लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत लोकांना राशन वाटप करण्यात येते, त्यासाठी लोकांच्या बोटांचे अंगठे स्कॅन केल्या जाते त्याकरिता सुद्धा इंटरनेट चा वापर होते मात्र विस्कळीत झालेल्या इंटरनेट च्या सुविधेमुळे राशनदुकानदार राशन वाटप करू शकत नसल्याने, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि राशन दुकानदारांना सुद्धा बसत आहे व अनेक नागरिक राशन घेण्यापासून वंचित राहत असल्याने ऑफलाईन पद्धतीने राशन वितरीत करण्याची मुभा देण्यात यावी. अशी मागणी खा. किरसान यांनी संसदेत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here