आली ही आली बघा- गाडी ही आली
गुवाहाटीची बघा-गाडी ही आली
ओलांडुनिया वाडी- तुडवीत रानझाडी
पन्नास खोक्याची गाडी-आली हो… आली हो….2 ।।।।
सांगा ना आमदार साहेब-विचार तुमचा
शंभर कोटीचा हिसाब-दया ना हो आमचा -2
आपलीच भरली झोळी-जनतेची करून होळी-2
विकास भाऊ कुठे गेला हो… गेला हो ।।1।।
रस्त्याने जाऊन बघा-जरा पायदळ
खड्यात लपून बसला-आमुचा तो काळ-2
लोकांची करून माती- काय मिळेल तुमच्या हाती-2
दुर्दशा चंद्रपूरची केली हो… केली हो ।।2।।
अपघाताने भाऊ-जातात जीव
आहे का तुम्हाला-गरिबांची कीव-2
खाऊ-खाऊ झाले मस्त-जनता आहे त्रस्त-2
खेचा यांना आता खाली हो… खाली हो ।।3।।
कवी/ गायक – अविनाश मेश्राम
चंद्रपूर

