वसुंधरा इको क्लबची स्थापना फलकाचे अनावरण,अध्यक्षपदी विद्यार्थिनी गायत्री वटाणे हिची निवड..
जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी 9175794502 – मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर वरखेडा येथे आज वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले.
सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये या दिंडी विषयी उत्साहाचे वातावरण होते.वरखेडा गावातून वृक्षदिंडीची प्रभात फेरी काढून लोकांमध्ये वृक्षांचे अर्थात झाडांचे महत्त्व घोषवाक्य द्वारे विद्यार्थ्यांनी मोठ्या जयघोषाने करून दिले ठिकठिकाणी वृक्षदिंडी व पालखीचे पूजन करण्यात आले.
वृक्षदिंडीनंतर विद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले वृक्षदिंडी व पालखीचे तसेच विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पद्माकर दादा उफाडे,सामाजिक वनीकरण दिंडोरी वन परिमंडळ अधिकारी श्री.एम.एल.पवार साहेब,वन रक्षक दिनेश चौधरी,संगणक सहाय्यक जावेद शेख दिंडोरी,शालेय समिती अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ,सदस्य पद्माकर दादा वडजे, दिलीप (माऊली) उफाडे,विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक सुनिल पाटील सर,वरिष्ठ लिपिक कैलास उगले भाऊसाहेब,जगदीश वडजे(युनिव्हर्सल ह्यूमन right दिंडोरी तालुका उपध्यक्ष )यांच्या हस्ते करण्यात आले.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे..या अभंगाद्वारे वृक्षांचे महत्त्व श्री.दिलीप माऊली उफाडे यांनी पटवून दिले.वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे उपशिक्षक श्री विठ्ठल ढिकले यांनी सांगितले..
आज जगापुढे वृक्ष संवर्धन करणे हा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.प्रत्येकाने एक तरी झाड लावावे व त्याचे संवर्धन करावे.असे कार्यक्रमास असलेले प्रमुख पाहुणे सामाजिक वनीकरण अधिकारी श्री. एम.एल.पवार साहेब यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर दादा वडजे यांनी ‘वृक्ष हे आपले मित्र आहेत.ते असतील तर आपले अस्तित्व आहे.त्यामुळे वृक्षांची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले.
‘जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे वृक्ष तोड.ही थांबवायची असेल तर आपण वृक्ष संवर्धनाचा वसा जोपासायला हवा असे आवाहन प्रभारी मुख्याध्यापक सुनील पाटील सर यांनी केले.
वृक्ष दिंडी निमित्त विद्यालयाला सामाजिक वनीकरण विभाग दिंडोरी यांच्याकडून २०० विविध जातीच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले.आणि हरितसेनेच्या माध्यमातून आज विद्यालयात २५ वृक्षांचे वृक्षारोपण करून इतर वृक्ष विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
वृक्षदिंडी निमित्त विद्यालयात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वैश्विक तापमानाचे दुष्परिणाम,वृक्ष लागवड व संवर्धन, वृक्षतोड,आदी विषयांवर आधारित चित्रे काढून त्यांचे छोटेखानी प्रदर्शन ही भरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय जाधव यांनी तर आभार हरितसेना प्रमुख उपशिक्षक संजीव पठाडे यांनी मानले.कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

