माथा येथील विद्यार्थीनी व विद्यार्थी यांची निवड
कोरपना प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – कोरपना तालुक्यातील माथा येथील विद्यार्थी व विद्यार्थीनी गावाचे तसेच आई वडिलांचे नाव लैकीक केल्याबद्दल माजी आमदार अँड संजय धोटे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,कोरपना तालुक्यातील माथा येथील रहवाशी नामदेव झंझाड,यांचा मुलगा कुमार अतुल झंझाड यांची कारवा निरीक्षक ( जल संपदा विभाग) म्हणून निवड झाली,श्री पुंडलिक सिडाम यांचा मुलगा कुमार पंकज सिडाम यांची महाराष्ट्र सुरक्षा बल विभागात निवड झाली,महादेव घारघाटे यांची मुलगी कुमारी स्वेता घारघाटे यांची महाराष्ट्र पोलीस विभागात निवड झाली तसेच गफार खान पठाण यांची मुलगी कुमारी सिमरन खान पठाण हिची सुध्दा पोलीस विभागात निवड झाल्याबद्दल या सर्वाचे व त्यांच्या आई वडिलांचे माजी आमदार अँड संजय धोटे यांचे हस्ते शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी गावचे उपसरपंच शशिकांत अडकीने, भाजपाचे युवा नेते निलेश ताजने,धानोली तांडाचे माजी सरपंच विजय रणदिवे, संदीप टोंगे,महादेव घारघाटे,पुंडलिक सीडाम, राजू नांदेकर,खंडू डाखरे आदी उपस्थित होते.

