प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – मुख्यमंत्री वयोश्री योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात असून डिसेंबर 2023 रोजी 65 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येतो. मुख्यमंत्र्यांनी वयोवृद्धांना आर्थिक सहाय्य मिळावे चष्मा व इतर काही साहित्य घेण्यासाठी एकदा तीन हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे त्यासाठी सामाजिक न्याय विभागाची स्वायत्ते संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने चंद्रपूर प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समतादुत यांच्यामार्फत वयोश्री योजनेचे मोफत फॉर्म भरून दिले जात आहे.
त्यासाठी माधुरी उराडे चंद्रपूर तहसील कार्यालय – 7798468582 संदीप रामटेके समाज कल्याण चंद्रपूर – 9112883665 उपेंद्र वनकर मुल – 8806032421 अस्मिता वनकर बल्लारशा – 9689581213 बालाजी मोरे कोरपणा – 9923531305 राम मोरे जिवती- 9527720732 प गणेश हनवते भद्रावती- 7758032122 लता पगडपल्लीवार राजुरा- 9921028311 रमेश मडावी वरोरा- 9763802481 कृपाली धारणे सिंदेवाही – 7798385469 मोरेश्वर वाकडे पोभूर्णा – 9404785331 स्वप्निल कुमार वंजारे चिमूर – 7350552140 प्रज्ञा राजुरवाळे चिमूर – 9689320497 रज्जू मेंढुलकर ब्रह्मपुरी – 8975982441 वर्षा करेंगुलवार ब्रह्मपुरी 9404119647 या समतादुत मार्फत तहसील कार्यालय या ठिकाणी मोफत वयोश्री योजनेचे फार भरून दिल्या जात आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत पात्र जेष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, कंबर बेल्ट, सर्वाईकल कॉलर खरेदी करता येतील. राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगा उपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र, मनःशांती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे जेष्ठांना सहभागी होता येणार आहे. ३१ डिसेंबर २०२३ ला वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, आधार कार्ड असलेल्या व कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयाच्या आत असलेल्या जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

