वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशांत सर प्रबोधिनी न्यूज चे संपादक
दिनांक १५-८-२०२४
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
हा आनंदी क्षण असो आयुष्यात
सोनेरी तुझ्या आयुष्याला
मिळो बळ प्रगती उन्नती सदोदित //१//
प्रतिभेचा पुत्ररत्न असा
प्रबोधिनीचा पाया रचिला थोर
कवी कवीयित्री लेखकांना मिळतो
वाव या माध्यमात प्रचाराचा जोर //२//
ताराचंद पिता ते धन्य
आहे वडिलांच्या नावात साजे
एक चमकता तारा प्रबोधिनीचा
प्रतिदिन मिळो सुख शांती समृद्धी ती रोज //३//
सिंदेवाही तालुक्यातील गाव आहे
कळमगाव गन्ना तेथील लोकांना ही वाटे शान
झाला पोर संपादक त्यांनाही वाटे अभिमान
हीच शुभेच्छा आहे वाढदिवसाला मान //४//
रंजना भैसारे
नागपूर

