जन्मदिवस तुझा,खूपखास असावा
यशाच्या उंच शिखरावर,तु दिसावा
गगनि घेता भरारी, कौतुक तुझे असावे
मनाच्या स्पंदनात ,घर तुझे दिसावे
तार्यांसारखा नेहमी चमकावास तु
कीर्तीवंत होऊनी सदैव झळकावास तु
स्वप्न तुझे सर्व, नेहमीच व्हावेत पुर्ण
मनोमनी शुभेच्छा, राहो न काही अपुर्ण
सोनेरी तुझ्या आयुष्याला सोनेरी क्षणांनी व्यापावे
सोनेरी तुझ्या जीवनाला सौख्य माझेही लाभावे.
सौ. सीमा गाडेकर

