कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२४ रोजी सेवा फाउंडेशन नागपूर व आमचा गाव, आमचा विकास समिती मिनघरी यांच्या वतीने ग्राम पंचायत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिरात २८ रक्तविरांनी रक्तदान करून स्वातंत्र्यदिन साजरा केला.सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी शुभांगी आत्राम सरपंच मिनघरी , विमीत दहिवले उपसरपंच ग्रामपंचायत मिनघरी किशोर गायकवाड, हिवराज बोरकर। ग्रामपंचायत सदस्य मिनघरी उपस्थित होते.
यावेळी चंद्रपुर जिल्हा रक्तपेढीतील डॉ. जाधव, आणि त्यांची चमु यांनी रक्त संकलन केले.जिल्हा रक्तपेढीतील कर्मचार्यांनी रकतदात्याना रक्तदानाचे फायदे व मार्गदर्शन केले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी हेमंत बंसोड,अंकित कावळे,लिखित गुरनुले, लोकेश अंबाडारे, विष्णू गुरनुले,अनिल शेंडे, रजत गावतुरे, अक्षय गावतुरे,अभिजित शेंडे,आणि गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले.

