आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनिरीक्षक दिलीप पनकुले यांच्या उपस्थितीत
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर – २०२४ ला महाराष्ट्रात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातून “बल्लारपूर चंद्रपूर अश्या दोन जागा महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार) वाट्यात घ्याव्या अशी मागणी,जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते,तालुका अध्यक्ष,विधानसभा अध्यक्ष,यांनी पक्ष निरीक्षक दिलीप पनकुले यांच्या समक्ष मांडली.
बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष तथा महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई यांनी बल्लारपूर,चंद्रपूर, दोन जागा आपल्या कोट्यात घ्याव्या,आयात उमदेवार आम्ही खपवून घेणार नाही.अशी भूमिका मांडली
पक्षनिरीक्षक पनकुले यांनी सुद्धा यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे कळवाव्या, अशी मागणी केली.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल,युवक जिल्हाध्यक्ष सुमित समर्थ युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर,ज्येष्ठ नेते प्रदेश,पक्षाचे सरचिटणीस हिराचंद बोरकुटे,चंद्रपूर शहर कार्याध्यक्ष सुधाकर कातकर, राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, नगभीड विधानसभा अध्यक्ष रघुनाथ बोरकर ,चंद्रपूर तालुका अध्यक्ष रमेश वहाटे,राजुरा तालुका अध्यक्ष श्री.आसिफ सय्यद, बल्लारपूर शहराध्यक्ष बादल उराडे पोभूर्णl तालुका अध्यक्ष हिराजी पावडे. सिंदेवाही तालुका अध्यक्ष बबलु शेख, वरोरा तालुका अध्यक्ष अविनाश ढेगळे, मुल तालुका कार्याध्यक्ष जितेश जित्तीवार, परब गिरडकर, सुरज चव्हाण,महीला तालुका अध्यक्ष सुशिला तेलमोर शहर कार्याध्यक्षा मोनाली काकडे, वरोरा तालुकाअध्यक्ष अविनाश ढेगळे यांच्या सोबत वरोरा तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी वरोरा विधानसभा राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार कोट्यात घ्यावी अशी मागणी केली.
पदाधिकाऱ्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत बल्लारपूर विधानसभेची जागा मागील 30 वर्षांपासून काँग्रेस पक्ष लढत आहे आणि पराभूत होत आहे,त्यामुळे “बल्लारपूरची” जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात घेण्यासंदर्भात भूमिका घेत,चंद्रपूर जिल्ह्यात २०२४ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार लढलेच पहिजे आम्ही आयात उमदेवार खुपवून घेण्यात नाही. नाहीतर जिल्ह्यात असंतोष निर्माण होणार अश्या भावना पक्ष निरिक्षकांसमोर व्यक्त केल्या .
याप्रंगी निरिक्षक दिलीप पनकुले यांच्या उपस्थितीत बेबीताई उईके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अखील भारतीय आदिवासी विकास परिषेच्या महीला जिल्हा कार्याध्यक्ष नीलिमा आत्राम यांच्या सोबत संघटनेतील पदाधिकारी,आदिवासी बांधवानी महिलांनी तसेच आरेपवर ,दिपक खोब्रागडे,सिहल नगराडे ,सतीश मांडवकर,युवकांनी राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
चंद्रपूर जिल्हा समता ब्रोकर असोशियन तर्फे पनकुले साहेब यांना पुष्गुच्छ देवून स्वागत केले.
निरिक्षक दिलिप पनकुले साहेब म्हणाले नक्कीच तुम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार. अशी ग्वाही दिली .
पक्षा तर्फे लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारी करीता सोबत जोडलेल्या विहीत अर्ज भरून 25 आगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत जिल्हा कार्याध्यक्ष बेबीताई उईके यांच्या कडे जमा करण्यात यावे. विहीत वेळेत दाखल केलेले परिपूर्ण अर्जच पक्षाची उमेदवारी निश्चित करताना विचारात घेण्यात येईल असे पनकुले साहेब यांनी निर्देश दिले.यावेळी उपास्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के.आरिकर, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.महादेवराव पिदुरकर,जिल्हाध्यक्ष माणिकराव लोणकर,व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हाध्यक्ष नागरिक विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास बहादे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक बुजाडे, युवक शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मल्लारप महीला शहरअध्यक्ष शिल्पा कामडे माजी नगरसेवक राजेंद्र आखरे,सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष नितीन पिंपळशेंडे , शरद मानकर भोंगाडे, नगाजी निंबाळकर, अशोक मर्गांनवार कुणाल गायकवाड पूजा शेरकी, वंदना आवळे, अर्चना चावरे, अनीता मावलिकर,मलेश्र्वरी महेशकर किरण साळवी, सुशिला डकरे निता गेडाम, माया सातपुते, घरडेताई, प्रतिभा मार्गंवार , प्रियंका बहादुरे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष बब्बुभाई ईसा,राहुल देवतडे,यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन युवक कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी आणि वंदना आवळे यांनी केले.

