आम्हाला कामावर परत घ्या नाहीतर आमच्या जमिनी वापस करा..
विजयक्रांती जि. ई. पि. एल. पॉवर स्थायी कामगार संघटना
दिपाली पाटील महिला जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर – घुग्घुस – अंतर्गत गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तथा हस्तांतरित कंपनी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चे कार्यरत कामगारांचा स्वतःच्या न्यायिक हक्कासाठी आंदोलनाचा पवित्रा…..
वर्ष 2007 ते 2008 मध्ये गुप्ता प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शेणगाव, वढा, घुगुस, पांढरकवडा, ऊसेगाव या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन कायद्याअंतर्गत न घेता, त्यांच्या घरातील एका माणसाला स्थायी स्वरूपाची नोकरी चे आमिष दाखवून मार्केट रेट पेक्षा कमी किमतीत,कवडीमोल भावात, परस्पर विक्री करून घेतल्या, त्या पद्धतीचे संबंधित कंपनी कडून शेतकऱ्यांना करार पत्र सुद्धा करून दिले.
सदर करार पत्रानुसार कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा कामगारांना 2012 ते 2013 मध्ये सहा महिन्याच्या ट्रेनिंग बेसवर महाराष्ट्र न्यूनतम कायद्याअंतर्गत कामावर रुजू करून घेतले. त्यानंतर त्या कामगारांना स्थायी स्वरूपात कायम करण्यात येणार होते. पण त्या कामगाराचे दुर्दैव असं की, कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे, 11 महिन्यातच कंपनीचे वीज निर्मिती चे स्वप्न भंग पावले. त्यानंतर कंपनी वर्ष 2014 ते 2017 पर्यंत कुठल्याही प्रकारचे प्रोडक्शन न करता चालू राहिली, दरम्यानच्या काळात सर्व कामगार नियमितपणे कंपनीत आपल्या रोजगारासाठी बिन पगाराने हजेरी लावत होते. या कालावधीत कोणत्याही कामगाराला नियमानुसार कुठल्याही पद्धतीची पूर्वसूचना न देता, कंपनी चालू आहे किंवा बंद आहे, या बाबत माहिती पुरवली गेली नाही.
वर्ष 2017 मध्ये गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने स्वतःला दिवाळखोर घोषित करत बँक तसेच लिक्विडेटरच्या मार्फत NCLT कोर्टामध्ये दावा दाखल केला. याबाबत कंपनीने कामगाराला NCLT च्या रिझोल्युशन मध्ये, कामगाराच्या स्थायी नोकरीसाठी तसेच त्यांच्या थकित पगाराचे बाबतीत काय प्रावधान आहे याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती पुरवल्या गेली नाही.
2021 मध्ये NCLT च्या मध्यस्थी नंतर बँक आणि लिक्विडेटर च्या माध्यमातून लिलावा अंतर्गत गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हस्तांतरित करण्यात आली. बँक आणि लिक्विडेटर च्या माध्यमातून, आज रोजी कामगारांना तुटपुंजी रक्कम देऊन त्यांच्या नोकरीच्या अधिकारापासून कायमचे डावलण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. याबाबत विजयक्रांती जि. ई. पि. एल. पॉवर स्थायी कामगार संघटनेने संबंधित प्रशासन आणि गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तसेच हस्तांतरित कंपनी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी लिमिटेड, यांना वारंवार पत्र व्यवहार करून कामगारांच्या बेरोजगारींच्या समस्या चे निराकरण करण्यासाठी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित प्रशासन आणि कंपनी कामगारांच्या समस्या कडे बुद्धी पुरस्कारपणे दुर्लक्ष करत होते. नाईलाजास्तव कामगारांना कंपनीत *,काम बंद तसेच धरणे आंदोलनाचा* आधार घ्यावा लागत आहे.
संबंधित कंपनी जोपर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगारांना, परत कामावर घेण्याचे लिखित आश्वासन देत नाही किंवा कामगारांना त्याचा हक्क मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील, असा संतप्त आक्रोश कामगाराकडून होत आहे.
या आंदोलनात विजयक्रांती जि. ई. पी.एल. पावर स्थायी कामगार संघटनेच्या अध्यक्षा मा. शिवानी ताई वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे,कार्याध्यक्ष – मा.प्रवीण भाऊ लांडगे तथा जिल्हाध्यक्ष- राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र, एन. एस.यु.आय. जिल्हाध्यक्ष – शफाक शेख, तसेच संघटनेचे महासचिव – महेंद्रा वडस्कर, उपाध्यक्ष- विजय सोनेकर, अरविंद पाचवाई, कार्यालयीन प्रमुख- सतीश शेंडे, राजू पिंपळशेंडे, प्रशांत ढेंगडे , जितेंद्र झाडे, नितीन खनके, अनिल पायपरे, राजेश जेनेकर, रंजीत पिंपळशेंडे, भारत खनके, प्रवीण भगत, विलास भगत, अनिल निखाडे तसेच सर्व कामगारांच्या उपस्थितीचा सहभाग आहे…

