अंजनीच्या सुता
तुला रामाचं वरदान
माझ्या मुखाने गाते
तुझ्या नावाचं गुण गाणं
एक मुखाने बोला
जय जय हनुमान ….१
अंजनीचा पुत्र
रामभक्त तू हनुमान .
लंका जाळून आला
बजरंगी शक्तिमान .
एक मुखाने बोला
बोला जय जय हनुमान ….२
लक्ष्मणा आली मुर्च्छा
तू झालास बेभान
द्रोणागिरी उचलून आणला
वाचवले लक्ष्मणाचे प्राण
एक मुखाने बोला
जय जय हनुमान…३
सीतामाई शोधासाठी
तू आलास लंका जाळून
भूत पिशाच्च संकट जाती
तुला पाहून पळून
एक मुखाने बोला
बोला जय जय हनुमान ….४
मंदिरात तुझ्या गाते
तुझ्या नावाचं भजन
अंजनी पुत्र देवा
तुला मनापासून वंदन.
एक मुखाने बोला
बोला जय जय हनुमान….५
कवियत्री भारतीय वसंत वाघमारे
तालुका आंबेगाव जिल्हा पुणे

