Home ठळक बातम्या ‘बहिणीं’ ना घेऊन जाणारा बसचालक नशेत

‘बहिणीं’ ना घेऊन जाणारा बसचालक नशेत

0
190

ऑटोरिक्षाला धडक, महिलेने घेतली उडी; नागपुरातील थरारक घटना

नागपूर प्रतिनिधी – रेशीमबाग येथील ‘लाडकी बहीण’ कार्यक्रम आटोपून लाडक्या बहिणींना घेऊन जाणाऱ्या मद्यधुंद बसचालकाने ऑटोरिक्षाला धडक दिली. यात ऑटोचालक जखमी झाला. तर, जिवाच्या भीतीने एका महिलेने या बसधून उडी घेतली. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडा चौक परिसरात घडली.

आजची कविता -रामभक्त हनुमान


मजहर खान (वय २९, रा. भालदारपुरा), असे जखमी ऑटोचालकाचे तर संदीप डोंगरे (वय ४०, रा. रुईपांजरी) असे मद्यधुंद बसचालकाचे नाव आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरणाचा कार्यक्रम शनिवारी रेशीमबाग मैदानावर झाला. कार्यक्रम संपल्यानंतर एमएच ३१ डीएस १५३८ या क्रमांकाची बस महिलांना परत घेऊन जात होती. संदीप हा दारू पिऊन बस चालवित होता. मानेवाडा चौक परिसरात एमएच ४९ सीएफ २४८१ क्रमांकाच्या ऑटोला मागून बसने धडक दिली. ऑटो उलटल्याने मजहर खान जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

आजची कविता प्रेमफुला


अपघातानंतर एका महिलेने बसमधून उडी घेतली. बसचालक संदीप हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताच नागरिकांनी त्याला पकडले. तेथे तैनात पोलिस लगेच घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या तावडीतून त्याची सुटका करीत हुडकेश्वर पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी संदीपविरुद्ध अपघातासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

आजची कविता बलात्कार याला सरकार चं जबाबदार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here