आजची कविता – मन मंदिरात तू

0
71

मन मंदिरात तू सजणा माझ्या
तू हसताना हसरे अंबर
तुझ्या प्रितीची वाट मखमली
बकुळीचा तो गंध अनावर

तू नसताना नको वाटतो
रिमझिम झरणारा हा श्रावण
सरी आक्रमक मोहक धुंदी
सरीत कितीदा भिजलो आपण

प्रिय मला तू सजणा माझ्या
तुझ्याविना हे विराण अंगण
विश्वासाचा हात तुझा हा
सुगंधी क्षणाची मधुर शिंपण

नयना मधल्या सख्यासावळ्या
द्ददयामध्ये तुझेच स्पंदन
हरते डाव मी तुझ्याचसाठी
जन्मोजन्मीचे हे बंधन

साथ तुझी ती मंतरलेली
रंग मनोहर अवतीभवती
जन्मभराचा करार केला
चंद्र कोरते भाळावरती

जुळले नाजूक बंद कसे हे
कुणी बांधल्या रेशीमगाठी
श्वासातून उजळून घेते
अपुल्या रे बंधन गाठी

कवयित्री:गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here