भीम आर्मीचे विनोद कोल्हे यांचा इशारा
लातूर प्रतिनिधी:-जे नवं ते लातूरला हवं अशी मन महाराष्ट्र मध्ये काही दिवसापूर्वी होती, परंतु त्या म्हणी प्रमाणे लातूरमध्ये काही घडलेलं नाही लातूरमध्ये आणखीनही गोरगरिबांचे झोपडपट्टीवाश्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यातलाच भाग म्हणजे लातूर शहरातील स्लम एरिया, लातूर शहरात दलित आणि मुस्लिम वस्ती भरपूर आहेत त्या वस्ती आजही विकासापासून वंचित आहेत त्यातलाच भाग म्हणजे लातूर शहरातील कॉईल नगर झोपडपट्टी हा भाग
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कॉईल नगर या भागामध्ये घरकुल या योजनेसाठी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते, होय ते खरे आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त घरकुल हे त्यांच्या काळात लातूरमध्येच आले होते लातूर शहरात १९९२/९३ पासून कोई ल नगर झोपडपट्टी ही अस्तित्वात आहे त्यापूर्वी ही झोपडपट्टी मंठाळे नगर या ठिकाणी होती मंठाळे नगरचे स्थलांतर करून कॉईल नगर या ठिकाणी बसवण्यात आले यांनी कॉईल नगर झोपडपट्टी येथील नागरिकांसाठी ४५० घरकुल मंजूर करून दिले होते त्याप्रमाणे बांधकाम होऊन २०१० मध्ये कॉईल नगर झोपडपट्टी येथील काही घरांचे स्थलांतर जी प्लस टू मध्ये करण्यात आले कॉईल नगर झोपडपट्टी येथील आजही अर्धे घर हे पत्र्याच्या घरामध्ये वास्तव्य करत आहे २०१० पासून एक काही व्यक्तीला त्या ठिकाणी घरकुल भेटले नाही त्या ठिकाणी सोयी सुविधांचा आजही अभाव दिसून येतो या वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेला आहे, पाण्याची टाकी असून पाण्यासाठी प्रेशर नाही, नाली व्यवस्थित साफ केली जात नाही साफ केले तर ती उचलली जात नाही त्यातच १९९३ पासून असलेल्या झोपडपट्टीला आजही महानगरपालिकेने वास्तव्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही, नळपट्टी घरपट्टी येथील लोकांना नियमित येत असते परंतु येथील लोकांचा ८अ अजूनही निघत नाही किंवा महत्त्वाचा मुद्दा म्हणला तर या ठिकाणी बिल्डिंग चे घर असतील किंवा पत्र्यातील घर असतील अशा १००० घरांना अद्यापही महानगरपालिकेने कबाले वाटप केलेले नाही, राजकारणी लोक कबाले तयार आहेत लवकरात लवकर वाटप करू असे प्रत्येक इलेक्शनला आश्वासन देतात आणि इलेक्शन झाले की विसरून जातात, उद्या पुनर्वसन च्या नावाखाली येथील लोकांना बाहेर उचलून शहराच्या बाहेर ही फेकले जाईल याची भिती येथील लोकांना आहे, महानगरपालिकेने लवकरात लवकर वाटप करावे यासाठी येथील नागरिक महानगरपालिकेत वारंवार चकरा मारत आहेत परंतु तेथील महानगरपालिकेचे अधिकारी या लोकांच्या कबालेचा प्रश्नावर तोडगा काढत नाहीत.
कॉईल नगरसह लातूर शहरात सर्व स्लम एरियामध्ये लवकरात लवकर कबाले वाटप करण्यात यावे अन्यथा भीम आर्मीच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्यात येईल.

