prabodhini news logo
Home चंद्रपूर तान्हा पोळा म्हणजे बालगोपालांसाठी आनंदाची पर्वणी.- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

तान्हा पोळा म्हणजे बालगोपालांसाठी आनंदाची पर्वणी.- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

0
200

ब्रम्हपूरी येथे विविध प्रभागात तान्हा पोळा

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

शेती, शेतकरी व कृषी संस्कृतीचे सोबतच शेतकऱ्यांचा सखा बनून शेतात राबणाऱ्या सर्जाराजाचे महत्व लहान मुलांना कळावे म्हणून तान्हा पोळा उत्सव साजरा केला जातो. बैल पोळा व तान्हा पोळ्याच्या निमीत्ताने समाजातील विविध जाती-धर्मातील नागरिक एकत्र येत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. परंतु खरं म्हणजे बालगोपालांच्या चेहऱ्यावर तान्हा पोळ्याच्या दिवशी दिसणारा आनंद हा निराळाच असतो कारण तान्हा पोळा हा सण बालगोपालांसाठी आनंदाची पर्वणीच असतो असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

तान्हा पोळा उत्सवाच्या निमीत्ताने ब्रम्हपूरी शहरात आयोजित कार्यक्रमात ते होते.
ब्रम्हपूरी शहरातील धुम्मनखेडा बाजार चौक, गांधीनगर, पेठवार्ड या ठीकाणी भरविण्यात आलेल्या तान्हा पोळ्याला भेट देत त्यांनी चिमुकल्या बालगोपालांसोबत देखील यावेळी संवाद साधला.
पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आजच्या तांत्रिक युगात बैलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात फक्त चित्रातच बैल बघायला मिळतो की काय अशी भीतीही मनात आहे. परर्यावरण संतुलनासाठी पृथ्वीवर प्रत्येक सजीवाचे विशेष महत्त्व आहे अशी उदाहरणे देऊन त्यांनी बालगोपालांना बैलाचे महत्त्व समजावून सांगितले.

तान्हा पोळ्यात चिमुकले बालगोपाल सजावट केलेले नंदीबैल घेऊन सहभागी झाले होते. वेगवेगळी आकर्षक वेशभूषा व केशमुषा करून लहान मुलांनी नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. व सामाजिक संदेश सुध्दा दिला.
यावेळी तान्हा पोळ्यात सहभागी सर्व चिमुकल्यांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून स्कुल बॅग व अन्य भेटवस्तू वितरीत करण्यात आल्या.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी प्राचार्य डॉ.कोकोडे, माजी नगरसेवक डॉ.नितीन उराडे, माजी न.प.सभापती महेश भर्रे, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, माजी नगरसेविका अंजली उरकुडे, योगेश मिसार, मनोज कावळे, कृउबा संचालक प्रशांत उराडे, राकेश पडोळे, अनंता उरकूडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here