अकोला प्रतिनिधी – अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणात सम्राट अशोक सेनाचा पाठिंबा दिले आहे. या सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे हे उपोषण महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या वतीने चालू आहे. त्यांची तब्येत खलावली आहे, तात्काळ शासनाने त्यांच्या मागण्याला पूर्ण मान्य करावे.
त्यांच्या हक्काची मागणी खालील प्रमाणे.
१. पोलिसांना दिवाळी बोनस देण्यात यावा.
२. पोलिसांचा पगाराचे जे कटोती टॅक्स फ्री करण्यात यावे
३. जुनी पेन्शन सुरु करावी
४. महाराष्ट्र पोलिसांची ८ तास ड्युटी करावी.
५. पोलीस पाल्य चे प्रमाणपत्र वडील ड्युटीवर असतानाच देण्यात यावे.
६. पोलीस बॉइज ला १५ % आरक्षण देण्यात यावे.
७. पोलीसाची ८ ते १० तासाच्या वर ड्युटी होत असेल तर तासिका प्रमाणे भत्ता देण्यात यावे.
८. पोलीस खात्यातून रिटायर्ड झाल्यावर देखील हॉस्पिटल चा लाभ देण्यात यावा.
९. पोलीस कर्मचारी व अधिकारी ह्यांच्यावर मुजोरी व मारहाण करणाऱ्यासब कठोर कारवाई करण्यात यावी व त्या साठी नवीन कायदा स्थापिक करण्यात यावा.
१०. पोलीस महिलांना लक्ष्मीपूजन व रक्षाबंधन या सणाच्या दिवशी सार्वजिक सुट्टी देण्यात यावी.
११. महिला पोलिसांना प्रेग्नेंसी मधे सुट्टी अजून २ महिने वाढून देण्यात यावी.
१२. पोलीस महामंडळ व मतदार संघ स्थापन करण्यात यावं.
१३. पोलीस मधील स्पोर्ट खेळणाऱ्याला विशेष अनुदान वाढून देण्यात यावं.
१४. प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारी रिटायर्ड झाल्या नंतर त्यांच्या वाहनाला टोल मुक्त करण्यात यावं.
१५. २००६ चे बॅचचे २ टायर्स हे एरिअस पैसे अद्याप मिळाले नाहीत ते देण्यात यावे.
१६. पोलीस रिटायर्ड झाल्या त्याच तारखेला पेन्शन व सर्व पैसे देण्यात यावे.
१७. पोलीस पत संस्था मधील व्याज दर ८% पेक्षा कमी आकारण्यात यावी.
१८. ग्रामीण पोलिस वसाहतीचे पुनर्निर्मान करण्यात यावी.
१९. घर बाधकामाकरिता कमी कालावधी मधे Dg लोन उपलब्ध करुन देण्यात यावे.
इच्छुक असलेल्या व लोन साठी अर्ज सादर केलेल्या कर्मचारी यांना कमी कालावधी
मध्ये लोन उपलब्ध करून देण्यात यावे.
२०. पोलीस कर्मचारी व अधिकारी ऑन ड्युटी कुटल्याही कारणास मरणपावल्यास त्या कर्मचारी व
अधिकारी यांच्या परिवारास शासनाने किंव्हा प्रशासनाने त्यांना मोठी रक्कम तात्काळ देण्यात यावी. २१. पोलिस पत संस्था मधे पात्रता असलेल्या पोलीस बॉइज ह्यांना घेण्यात यावे .
२२. दोन महिन्याचे अगाऊ वेतन देण्यात यावे (शनिवार व रविवार)
२३. २०१३ विभागीय परीक्षा पास झालेल्या सर्व अंमलदारांना लवकरात लवकर पुढील पदोन्नती द्यावी.
अशा विविध मागण्यासाठी हे उपोषण चालू आहे यांच्या मागण्या गृहमंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी लागू कराव्या अशी आम्ही मागणी करतो आणि उपोषणकर्त्या संघटनेला सर्वांनी सहकार्य करावे असा मी आवाहन करतो..

