परळी प्रतिनिधी:- परळी शहरातील भीम नगर येथील कुमारी अनिशा विलास आदोडे हिने एमबीबीएस ला प्रवेश मिळाल्याबद्दल तिचा भीम नगर जगतकर गल्ली च्या वतीने. सुगंध कुटी बुद्ध विहार येथे सहकुटुंब सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर येथील शेतकरी विलास भानुदास आदोडे यांच्या कुटुंबात जन्मलेली कुमारी . अनिशा विलास आदोडे हिने नुकतीच नीट परीक्षेत 572 मार्क घेऊन घवघवीत यश मिळवून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रवेश मिळविला असून याबद्दल भिम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बौद्ध विहार येथे कौटुंबिक सत्कार करण्यात आला असून यावेळी कुमारी अनिशा विलास आदोडे हिचे आई-वडील भाऊ चुलते आदी उपस्थित होते तर जेष्ठ नेते सोपान ताटे संजय जगतकर उत्तम भाऊ समुद्रे वसंत बनसोडे अशोक जगतकर डॉक्टर सिद्धार्थ जगतकर सामाजिक कार्यकर्ते संतोष आदोडे व बालासाहेब जगतकर इत्यादी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

