सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने रविवार दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी मातोश्री विद्यालय तुकूम, चंद्रपूर येथे दुपारी १२ वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष मा. प्रा.सुर्यकांत खनके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मा. गजेंद्र सुरकार होते तर पी.एम. जाधव जिल्हा कार्याध्यक्ष अंनिस चंद्रपूर, नारायण चव्हाण जिल्हा प्रधान सचिव अंनिस तसेच समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत मा गजेंद्र सुरकार राज्य प्रधान सचिव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी कार्यकर्त्यांना समितीच्या विविध विषयांवर तसेच उपक्रमावर बहुमूल्य मार्गदर्शन केले.समितीचे उपक्रम व कार्यक्रम राबवितांना येणाऱ्या अडचणी दूर करून समाजातील अंधश्रध्दा दूर करण्याचा प्रयत्न करावे असे सुचविले याकरिता राज्य पदाधिकारी आपल्या नेहमी पाठीशी राहील अशी ग्वाही दिली, मा. पी.एम. जाधव कार्याध्यक्ष महा अंनिस,मा. संतोष दोरखंडे शहर कार्याध्यक्ष यांनीही मनोगत व्यक्त केले. मा. प्रा. सूर्यकांत खनके जिल्हाध्यक्ष महा अंनिस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले पूर्वी लोक घरी आलेल्या पाहुण्यांना पाय धुवायला पाणी का द्यायचे? गुड खायला का द्यायचे? यामागील वैज्ञानिक कारण सांगितले. आजच्या या वैज्ञानिक युगात समाजाची व देशाची प्रगती करायची असेल तर विज्ञानाची कास धरावी लागेल असे त्यांनी सांगितले.
या बैठकीप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी समाजातील विविध अंधश्रद्धा बुवाबाजी या विषयावर प्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा केली या बैठकीला ऊर्जानगर शाखेचे मुरलीधर राठोड,देवराव कोंडेकर,दुरेंद्र गेडाम,बाळकृष्ण सोमलकर तसेच चंद्रपूर येथील भास्कर सपाट, पुरुषोत्तम बसुने, अशोक मेश्राम, अनंता आत्राम,दिलीप होरे, सचिन मुरकुटे,आनंद वनकर,जितेंद्र कुमार भाटिया व ईतर कार्यकर्त्यांची उपस्थित होते.

