आले दिवस पेरणीचे
पाहतो आभाळाचे ढग
गटातुनी घेतला पैसा
केली शेती उत्साहात ,
आला पाऊस मिर्गाचा
धान टाकलो शेतीत
रोवणे केले ले माझे सारे
गेले वाहून पुरात,
झोप लागत नव्हती रात्री
कर्ज दिसत होत डोळ्यात, आत्महत्या केल्यावर
सुख येईल का माझ्या परिवारात,
होते का सांगा
मंत्री मोहदय
मि घेतले ल कर्ज सूट
कुणासमोर हात पसरावे
गरिबाला कोण मदत करत,
शेत शिवार पाहता
डोळे भरून निगत,
उभ्या जगाचा पोशिंदा
फासा घालतो का गळ्यात
मरण दिसत सुखात,
नाट्य लेखक, कवी
खोजीद्र ढिवरुजी उराडे
मू. नलेश्वर पो. चिरोली ता. मूल जि. चंद्रपूर

