ब्रम्हपूरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर – सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अध्यक्ष असलेल्या ब्रम्हपूरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असुन दररोज लोकपयोगी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात येत आहेत.
याचाच भाग म्हणून मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते.
त्यामध्ये हृदयविकार, मधुमेह, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र रोग, रक्तदाब, शुगर तपासणी, ईसीजी, एक्स-रे व रक्तदान शिबीर घेण्यात आले.
यामध्ये ब्रम्हपूरी शहरासह तालुक्यातील शेकडो रुग्णांनी या शिबीरात आपली आरोग्य तपासणी केली. आरोग्य तपासणीसाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय, ब्रम्हपूरी उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील तज्ञ डाॅक्टर व वैद्यकीय चमू उपस्थित होती.
सदर शिबीराला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट देवून याठिकाणी उपस्थित रुग्णांची आस्थेने चौकशी करीत विचारपूस केली. व रक्तदान करणाऱ्या युवकांचे कौतुक करीत पाठीवर शाबासकीची थाप दिली.

