कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर – गणेशोत्सवाचे महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. लोक या काळात एकत्र येतात, अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे लोकांमध्ये एकतेचा संदेश देतात. हा सण लोकांमध्ये भक्ती, आनंद आणि उत्साह निर्माण करतो._
_ब्रम्हपुरी शहरात गणेशोत्सवाची खूप जुनी परंपरा आहे. गणेशोत्सव काळात ब्रम्हपुरी शहराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झालेले असते. ब्रम्हपुरी तसेच आजूबाजूच्या तीन-चार तालुक्यातील हजारो लोक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शहरात येत असतात. विघ्नहर्ता गणेश मंडळ सिव्हिल लाईन, गुजरी वॉर्ड यांच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.
ब्रम्हपुरी शहरातील सिव्हिल लाईन, गुजरी वॉर्ड येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या खास आग्रहात्सव गणपती बाप्पाच्या आरतीला उपस्थित राहत माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी विघ्नहर्ता गणरायाची आराधना केली.
यावेळी अमित कन्नाके उपाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी, वकार खान सामाजिक कार्यकर्ता ब्रह्मपुरी, मंडळाचे अध्यक्ष अविनाश भानारकर, उपाध्यक्ष अमित दोनाडकर, सचिव भूषण शिवूरकर, सहसचिव वैभव नन्नावरे, कोषाध्यक्ष ऋतिक भानारकर, विनायक भानारकर, किशोर शिवुरकर, रवींद्र ठोंबरे, शरद भानारकर, दिपक चौधरी, विशाल उरकुडे, किशोर डेकापुरवार, अमोल नामपल्लीवार, विश्वेस्वर भानारकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक जनता उपस्थित होती.

