दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर – चंद्रपूर – बल्लारशाह राष्ट्रीय महामार्गांवर आंबेडकर चौक येथे अपघात घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यासंदर्भात जनतेची तक्रार आम आदमी पार्टी युवा आघाडी कडे कडे येत आहे. या ठिकाणी दोन डिवायडर मध्ये मोठे अंतर असल्याने स्ट्रीट लाईट लावण्यात आलेले नाही. याठिकाणी ये- जा करणाऱ्या प्रवाशाची संख्या मोठ्या प्रमाणात असून आंबेडकर येथून सिद्धार्थ नगर कडे जाणाऱ्या वळणावर एक तर, गाडगेबाबा चौक कडून आंबेडकर नगर मध्ये जाणाऱ्या वळणावर एक असे दोन (२) हायमास्ट लाईट लावण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांनी मनपा आयुक्त यांना केले असून यावर लवकरच कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्याला दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे, यावेळेला निवेदन देतांना आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, महिला महानगर अध्यक्ष तब्बसुम शेख, जिल्हा संघटन मंत्री मनीष राऊत, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, युवा जिल्हा सचिव आदित्य नंदनवार, अयुब शेख, नजमा बेग इत्यादी उपस्थित होते.

