आजची कविता – देवा निरोप तुला देताना

0
82

आजची कविता – देवा निरोप तुला देताना

दहा दिवसांच्या
थाटामाटा नंतर
निरोप तुला देताना
होशील तू छू मंतर

जड अंतकरणाने
देवा तुला निरोप देताना
असू दे तुझा वरदहस्त
आम्ही जीवन जगताना

सगळ्यांचा बाप्पा तू
पुजतात तुला आनंदाने
रुपे तुझी अनेक, होते
कार्य आरंभ तुझ्या पूजनाने

सगळ्यांचा तारणहार तू
तूच आमचा विघ्नहर्ता
तूच आमचा गणराज
तूच आहे रक्षणकर्ता

कवयित्री
रेखा डायस
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here