आजची कविता -निरोप देता तुला

0
128

आजची कविता -निरोप देता तुला

दहा दिवस हर्ष
गजबज ही घरी
सूर तालाच्या छान
खेळल्यात लहरी…. १

गुणगान करून
दिला तुजला साद
ठेव भक्तावरती
सदैव आशीर्वाद….. २

निरोप देता तुला
मन गहिवरले
अश्रू दाटे नयनी
बाप्पा बघा चालले… ३

ढोल ताशा वाजती
जरीही जल्लोषात
क्षण निरोपाचा हा
खंत येई मनात…. ४

जातांना तू… देवा श्री
देतो तुला निरोप
कृपादृष्टी ठेवावी
नको कधीच कोप…. ५

चूक भूल आमुची
समजून तू घ्यावे
पुढच्या वर्षी देवा
तू लवकर यावे…. ६

कवयित्री हर्षा भुरे
भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here