राकेश खोब्रागडे यांची गिरगाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड

0
93

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर- गिरगाव येथील ग्राम पंचायत कार्यालय मध्ये दि.१२ सटेबर २०२४ ला विशेष ग्रामसभा सरपंच श्रीमती गीता बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,सदर ग्रामसभेत तंटामुक्ती समितीची नवीन कार्यकारिणीची समिती स्थापन करण्यात आली,त्यामध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री.राकेश गिरीधर खोब्रागडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
राकेश खोब्रागडे हे मागील पंचवार्षिक मध्ये त्यांनी ग्राम पंचायतचे सदस्य सुध्दा भूषविले आहे,ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. ते सध्या स्थानिक गिरगाव येथील श्रीलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेत दैनिक संकलक म्हणून कार्यरत आहेत.
या वेळेस खोब्रागडे यांनी गावातील नागरिकांचे आभार मानले.यावेळेस सरपंच गीता बोरकर व समस्त ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here