कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर – सिंदेवाही तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने संविधान महोत्सव साजरा केला. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटनिदेशक लक्कावार सर ,संविधान मंच चे उद्घाटन गडमौशी सरपंच सोनाली पेंदाम यांचे हस्ते करण्यात आले.
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने संविधान महोत्सव आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन 15 सप्टेंबर रोजी 11.00 वाजता साजरा करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी संविधान मंदिराचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम स्थळी उद्घाटक,अध्यक्षांचे तसेच मान्यवरांचे मनोगत लाभले. पुष्पगुच्छ देऊन स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंचाच्या माध्यमातून प्रशिक्षणकरणांना वाचण्याकरिता संविधान उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपले हक्क ,अधिकार ,कर्तव्य माहित व्हावे हाच उद्देश कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचा आहे .त्यानिमित्ताने या कार्यक्रम प्रसंगी पूजा अलमवार उपसरपंच तिघरे, माळी, जी टी मेश्राम कर्मचारी ,घडसे, रनदई, बिसेन ,जांगडे , सातपुते ,देठे, रामटेके , निकुरे ,हडपे, कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत अण्णाजी गोटे विजतंत्री निदेशक यांनी केले व आभार प्रदर्शन निकुरे सर वीजतंत्री विभाग यांनी केले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच कर्मचारी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

