कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – कोल्हापूर प्रतिष्ठान येथे आज वेगवेगळ्या प्रकारच्या फळ झाडांची लागवड केली त्यामध्ये सीताफळ, लिंबूचे झाड, कलमी आंबा, हापूस आंबा आशा विविध झाडांचा त्यामध्ये समावेश होता आणि वृक्षारोपण कार्यक्रमात डॉक्टर सागर गुडमारे, रोहिणी अमोल पराडकर, ऋचा महाबळ, शैलजा परमाणे, अनिता भोई, या सर्व मान्यवरांनी वृक्षाची लागवड करून सहकार्य केले.. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर सर यांनी कार्यक्रमा प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले ,“निसर्ग हा आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यात कशा प्रकारे बदल घडवून आणतो, निसर्गातील हवा ही मनाला कशी प्रसन्न करून जाते, आपलं आरोग्य निसर्ग कसा जपतो.” हे सांगून त्यांनी झाडांशी बोलून, पक्षांचा आवाज ऐकून, कशी सकारात्मक शक्ती निर्माण होते त्याच प्रात्यक्षिक करून दाखवलं… त्याच बरोबर सर्व सदस्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला व मिरज सोनी गावामध्ये भवानी मंदिर येथे प्रस्थान केले.कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहिणी पराडकर यांनी तेथे जमलेल्या भगिनींना मार्गदर्शन केले त्यामध्ये महिलांची सुरक्षा, महिला सुरक्षित आहेत का, आणि वेगवेगळ्या मार्गाने महिलांवर होणारे आत्याच्यार या विषयावर प्रश्न विचारून तेथील महिलांशी सवांद साधला व चर्चासत्र राबवलं आणि त्यामध्ये महिलांनी खूप सुंदर प्रकारे सहभाग घेऊन आपले मत मांडले व सहकार्य केले. याप्रसंगी तिथे मिरज सोनी गावातील शिक्षक, सरपंच, अध्यक्ष, शारदा यादव यांची उपस्थिती लाभली. व सुलोचना व सरपंच शारदा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन पाहूण्यांचे आदरतिथ्य सुलोचना पाटील ताई यांनी अगदी योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने केले.. तसेच याप्रसंगी महिलांचा आवडता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा खेळ रंगला व त्यामध्ये आश्विनी उल्हास पाटील यांना पैठणी जिंकण्याचा मान मिळाला .ऋचा महाबळ यांच्या मन दर्पण पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि खेळत सहभागी असलेल्या, चर्चेत सहभागी महिलांना फूल ना फुलांची पाकळी म्हणून प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करून या भव्य कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

