आगामी निवडणुकीत धोकेबाजांपासुन सावध राहा.
सैनिक समाज पार्टीचे चक्रधर मेश्राम आवाहन.
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिनांक १८ सप्तेबर २०२४:- महाराष्ट्रातील रिपब्लिकन म्हणून नेतृत्व करणारे, आणि काही गद्दार , रामदास आठवले, राजेंद्र गवई, जोगेंद्र कवाडे, खोरिपाचे खोब्रागडे, आंबेडकरवादी म्हणून घेणारे बसपा,बीआर एस पी प्रमुख सुरेश माने, विजय भटकर या सर्वांना सवर्णांचे राजकीय पक्ष, सवर्णांचे मिडिया, आणि सवर्णांचे राजकीय विश्लेषक यांनी जाणिवपूर्वक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतून अलगद बाद करुन टाकले आहे हे निर्विवाद सत्य आहे ते नाकारले जाऊ शकत नाही. त्यांची कुठेच चर्चा नाही, नांव नाही आणि निशाणही नाही.
एकंदरीत त्यांचे राजकीय अस्तित्व संपल्यात जमा झाल्यासारखे वाटते. आणि तसे समजायला हरकत नाही. हा कशाचा परिणाम असावा.?
दादासाहेब गायकवाड आणि दादासाहेब रूपवते यांनी कॉंग्रेस पक्षा सोबतं रिपब्लिकन पक्षाची पहिल्यांदा युती केली आणि तिथूनच रिपब्लिकन राजकारण संपवण्याचं षडयंत्र सुरू झाले त्याचाच हा परिणाम आहे आणि आता तोही भोगावा लागत आहे.!
सवर्ण मानसिकतेच्या राजकीय पक्षां सोबतं युती आणि आघाडी करुन आपला पक्ष वाढवू शकतो अशा भाबड्या आशेवर रिपब्लिकन नेते राहीले आणि संपले हा अनुभव आहे हे जनता ओरडून….सांगत आहे.
सवर्णांना सत्तेत कायम रहायचे आहे. ते आपल्याला सहजासहजी सत्ता देणार नाहीत. सत्ता संघर्ष करुन, आपले अस्तित्व दाखवूनच मिळवावी लागणार.
सत्तेत बसायचे असेल तर स्वतः च्या ताकदीवरच सत्ता मिळवावी लागणार आहे. सवर्णांचे राजकीय पक्ष आपसात युती करतात, एकमेकांना मतांची देवाणघेवाण करतात परंतु वंचित समुहाशी युती करीत नाहीत. वंचित समुहाला मते सुद्धा देतं नाहीत हा आजवरचा अनुभव आहे. हा पारंपारीक सत्ता संघर्ष आहे. सवर्ण विरुद्ध वंचित समुह…!! क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती वादी. घराणेशाही विरुद्ध लोकशाही. सरंजामी वृत्तीचे विरुद्ध फुले आंबेडकरी , छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा.
महाराष्ट्रात क्रांतीदर्शी विचारांचे राजकारण करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने घोरपडी पुणे येथील २९ सप्तेबरच्या भव्य जाहीर सभेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष बलवीरसिंग परमार आणि प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उमेदवार जाहीर करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
त्यामुळे घराणेशाही, प्रस्थापित राजकीय पक्ष आणि सरंजामी नेतृत्व संपविण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देऊन जनताच सज्ज झाली आहे. सवर्णांच्या राजकीय पक्षांची २०२४ ची लोकसभा संपली. आता मात्र पुढील निवडणुकीच्या काळात अशी गंभीर चुक होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे .

