महाविकास आघाडी जागावाटप धुळ्याबद्दल लवकरच निर्णय जाहीर करू
धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४) – धुळे -शिवसेना धुळे मतदार धुळे विधानसभा मतदारसंघ संदर्भात आज मनमाड येथे शासकीय विश्रामगृहावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील व विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार महानगर प्रमुख डॉ. सुशील महाजन यांनी भेट घेऊन मतदार संघाविषयी विस्तृतपणे चर्चा केली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू असून ,अजून कुठल्याही प्रकारे कोणत्याही मतदार संघ जाहीर झालेला नाही जागावाटप चर्चा ही अंतिम टप्प्यात असून धुळे शहर विधानसभा मतदारसंघ संघासाठी शिवसेना आग्रही असून ही जागा शिवसेना लढविणार , त्यामुळे कुठलाही पक्ष दावा दाखल करत असेल तर ते निराधार आहे समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून धुळ्यात समाजवादी पक्षाला जागा सुटली हे वृत्त निराधार आहे, महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी त्यासाठी थोडा वेळ घेणे आवश्यक असून महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या जागा त्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख जाहीर करतील त्यामुळे कोणी आताताईपणा करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे,शिवसेना पक्षाकडून अनेक जणांनी धुळ्यातून उमेदवारी मागितल्याचे देखील त्यांनी सांगितले , धुळ्याची मला खडानखडा माहिती आहे, त्या मुळे तुम्ही कामावर जोर द्या, संघटना मजबूती साठी तुम्ही चांगले काम केले आहे, धुळेकरांची शिवसेना पक्षा बद्दल आस्था वाढली असून ते मोठ्या उमेदीने पक्षाच्या घडामोडींची दखल घेत आहेत, शिवसेने महानगरपालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात चांगला आवाज उठविला होता, त्याची दखल धुळे करांनी घेऊन सर्व्हे रिपोर्ट मध्ये अनेक नागरिकांनी चांगले मत व्यक्त केलं आहे. धुळ्याची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढविणार असून सर्व शिवसैनिकांनी जोरात कामाला लागून उद्धव साहेबांच्या आदेशाने धुळे मतदार संघावर भगवा फडकवावा असे आदेश खासदार संजयजी राऊत यांनी याप्रसंगी दिले, यावेळी महानगर प्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन यांनी शिवसेना पक्षाच्या बी. एल .ए व बी.एल.ओ. बांधणी संदर्भात खा.संजय राऊत यांच्याशी चर्चा करून ही बांधणी सर्व 288 बुथवर पूर्ण झाल्याचे सांगितले, याच दरम्यान काल मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, साक्री तालुका उपजिल्हाप्रमुख हिम्मत साबळे, तालुकाप्रमुख चंद्रकांत देसले, यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साक्री विधानसभा मतदारसंघाविषयी आढावा बैठक पार पडली. या बैठकीस साक्री तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
याप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे यांनी आपला अहवाल देखील सादर केला यावेळी उपमहानगर प्रमुख कैलास बापू मराठे उपमहानगर प्रमुख कपिल लिंगायत हे उपस्थित होते.

