विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश
ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सध्या देशभरासह राज्यात देखील महागाईने कळस गाठला असुन सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे नागरिकांचा कल आता काॅंग्रेसकडे वाढलेला दिसून येत आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकाळात सुरु असलेला ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील विकास बघता मोठ्या प्रमाणात ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील नागरिक सुखावले असुन काॅंग्रेस पक्षाला समर्थन देत आहेत. ब्रम्हपूरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय विभागांच्या सर्व सोयीसुविधा युक्त नवीन इमारती उभ्या झाल्या आहेत. तर अनेक विकासकामे निर्माणाधीन आहेत. या सर्व विकास कामांमुळे प्रभावित होऊन व विधानसभा विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रम्हपूरी तालुक्यातील जुगनाळा गावातील अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
ब्रम्हपूरी येथे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कमलाई निवासस्थानी हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, जिल्हा काॅंग्रेसचे सचिव विलास विखार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, कृउबा संचालक किशोर राऊत, माजी सरपंच चंद्रशेखर मेश्राम, प्रा.चंद्रशेखर गणवीर, महीला काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष सुधा राऊत, शहर सचिव सुशिला सोंडवले, यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये माजी उपसरपंच प्रमोद धोटे, अमर तोंडरे, खुशाल सोंडवले, मधु सोनवाने, शरद पोहनकार, नाशिक धोंगडे, विनोद मुळे, दादाजी शेंडे, नानाजी पोहनकार, रवी पोहनकार, कुसन टेंभुर्णे, नितीन तोंडरे, अक्षय गुरनुले, रोषण लेनगुरे, ताराचंद मेश्राम, दामोधर पोहनकार, जिवन मेश्राम, धनू पोहणकार, मनोहर पोहणकार, शरद तोंडरे, रमेश ठाकरे, प्रवीण बनपुरकर, अतुल मुळे, अरुण श्रीसागर, प्रभाकर पोहणकार यांसह अन्य जणांचा समावेश आहे.
बॉक्स – ब्रम्हपुरीतील महीलांचाही काॅंग्रेस पक्षात प्रवेश
ब्रम्हपूरी शहरातील सुंदरनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या हेमलता सलामे व सुशिला वासनीक यांनी देखील यावेळी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

